breaking-newsमहाराष्ट्र

व्यवहारातून काकाची पुतण्याकडून हत्या

रत्नागिरी – रत्नागिरी एमआयडीसी येथे धावत्या गाडीत आनंद खेत्री या व्यापाऱ्याची गोळ्या घालून हत्या केल्याच्या आरोपावरून त्याचा पुतण्या किरण मल्लिकार्जुन पंचकट्टी (वय २२ वर्षे, मूळ रा. कर्नाटक) याला पोलिसांनी अटक केली आहे.

कर्नाटक राज्यातील गुलबर्गा येथे एका खून प्रकरणात फरारी असलेल्या किरण याला आनंदने आपल्या घरात जागा दिली. व्यवसाय सुरू करून देण्यासाठी मुद्रा योजनेतून नऊ लाख रुपयांचे कर्जही काढून दिले. यातील तीन लाख रुपये आनंदने किरणला न दिल्यामुळे दोघांमध्ये खटके उडाले. आनंदने किरणच्या कानशिलात लगावली. याचा राग मनात धरून किरणने आनंदच्याच पिस्तुलाने त्याला गोळ्या घालून ठार केले.

झाडगाव एमआयडीसी येथील अल्ट्राटेक सिमेंट कंपनीजवळ रविवारी रात्री धावत्या गाडीत गोळीबार झाला. यामध्ये आरोपी किरण याने गाडीमध्ये मागे बसून पिस्टलमधून आनंद याच्या डोक्यात गोळ्या झाडल्या. गंभीर जखमी अवस्थेत आनंद याला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले.

किरण पचकट्टी मूळचा कर्नाटक राज्यातील गुलबर्गा येथील आहे. मागील सहा महिन्यांपासून तो आनंदकडे वास्तव्याला होता. त्याच्या जुन्या गाडीचा किरणकडून अपघात झाला होता. गाडीच्या डागडुजीसाठी जवळपास दीड लाख रुपये खर्च आला होता. यानंतर किरण रत्नागिरीत स्थिरस्थावर होऊन त्याचा व्यवसाय सुरू व्हावा यासाठी आनंदने मुद्रा कर्ज योजनेअंतर्गत नऊ लाख रुपयांचा कर्ज प्रस्ताव तयार केला. कर्ज मंजूर करून देण्यासाठी आनंदने पाठपुरावा केला. ते मंजूर झाल्यानंतर एकूण रकमेपैकी जवळपास तीन लाखाची रक्कम इन्शुरन्स आणि पॉलिसीमध्ये गेली. उर्वरित सहा लाखांपैकी तीन लाख आनंदने नवीन क्रेटा गाडी घेण्यासाठी वापरले, तर तीन लाखातून किरणसाठी उद्यमनगर येथे ऑफिस काढून त्याचा व्यवसाय सुरू करून दिला.

कर्जाच्या रकमेतील तीन लाख रुपयांसाठी किरणने आनंदकडे तगादा सुरू केला. यावेळी आनंदने किरणला जुन्या गाडीच्या अपघातावेळी झालेल्या खर्चाची आठवण करून दिली. तीन लाख रुपये आपल्याला मिळणार नसल्याची शंका आल्यामुळे किरणने आनंदला दमदाटी केली. त्यावरून चिडलेल्या आनंदने गेल्या शनिवारी रात्री किरणच्या कानशिलात लगावली होती. याचा प्रचंड राग किरणला आला आणि आनंदचा काटा काढण्याचा निश्चय त्याने त्याच दिवशी केला. दुसऱ्या दिवशी आनंद त्याच्या मित्रांसमवेत नर्मदा सिमेंट कंपनीजवळील एका हॉटेलमध्ये होते. रात्री नऊच्या सुमारास या ठिकाणी किरण आला. आनंदच्या गाडीतून दोघे बाहेर पडले. किरण आनंदच्या मागे बसला होता. गाडी एका निर्जनस्थळी येताच किरणने पिस्तूल काढून आनंदच्या कानशिलाजवळ गोळी झाडली. थेट डोक्यात गोळी गेल्याने आनंदचा  घटनास्थळी मृत्यू झाला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button