breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर, ‘या’ तिघांचा संयुक्त गौरव

महा ई न्यूज | लंडन : वैद्यकशास्त्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शास्त्रज्ञांना आज नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. मेडिसिन क्षेत्रात जगातील सर्वोच्च समजला जाणारा हा पुरस्कार तीन शास्त्रज्ञांना संयुक्तपणे जाहीर करण्यात आला आहे. फिजिओलॉजी या वैध्यशास्त्रातील शोधासाठी विल्यम जी केलिन ज्युनियर, सर पीटर जे रॅटक्लिफ आणि ग्रेग एल सेमेन्जा या तिघांना संयुक्तपणे नोबेल पुरस्काराने देऊन गौरविण्यात येणार आहे. नोबेल पुरस्कार विजेत्याला पदक, प्रशस्ती पत्र आणि ४.५ कोटी रुपये रोख देण्यात येणार आहेत.

या तीन शास्त्रज्ञांनी कोशिकाएंच्या ऑक्सिजन ग्रहणावर करण्यात आलेल्या शोधासाठी हा पुरस्कार देण्यात येणार आहे. आज वैद्यकशास्त्रातील क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शास्त्रज्ञांच्या नावाची घोषणा करण्यात आली. उद्या भौतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शास्त्रज्ञांच्या नावाची घोषणा करण्यात येणार आहे. तसेच १४ ऑक्टोबरपर्यंत अन्य पाच क्षेत्रातील विजेत्यांच्या नावाची घोषणा होणार आहे. 

मंगळवार, ८ ऑक्टोबर – भौतिक शास्त्र, बुधवार, ९ ऑक्टोबर – रसायनशास्त्र, गुरुवार, १० ऑक्टोबर – साहित्य, शुक्रवार, ११ ऑक्टोबर – शांतता, सोमवार, १४ ऑक्टोबरला – अर्थशास्त्रासाठी  नोबेल पुरस्काराची घोषणा होणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button