breaking-newsराष्ट्रिय

बलात्कार पीडित भाजपा नेत्यास १० लाख रुपये देण्यास तयार: आप नेता

हरयाणातील रेवाडी बलात्कार प्रकरणावरून भाजपावर टीका करताना आप नेत्याची जीभ घसरली. भाजपा नेत्यांनी स्वतःवर १० जणांकडून बलात्कार करून घेतल्यास त्या नेत्याला १० लाख रुपयांची मदत देऊ, असे हरयाणातील आम आदमी पक्षाचे नेते नवीन जयहिंद यांनी म्हटले आहे.

हरयाणात रेवाडी बलात्कार प्रकरणामुळे संतापाची लाट उसळली आहे. सरकारने बलात्कार पीडित मुलीच्या कुटुंबियांना २ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. सरकारने दिलेली मदत कमी असल्याचे सांगताना आप नेते नवीन जयहिंद यांनी वादग्रस्त विधान केले. एखाद्या भाजपा नेत्याने स्वतःवर बलात्कार करून घेतल्यास त्यांना १० लाख रुपयांची भरपाई देऊ. मग त्यांना बलात्कार पीडित मुलीचे दुःख कळेल. तुम्ही मुलीच्या अब्रूची किंमत फक्त दोन लाख कशी ठरवू शकता, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

हरयाणात भाजपाची नव्हे तर कौरवांची सत्ता आहे. मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर महाभारतातील धृतराष्ट्रासारखे आंधळे आहेत, अशी टीका त्यांनी केली.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी बलात्कार पीडित तरुणीच्या आईने सरकारने दिलेला २ लाखांचा धनादेश परत करण्याचे जाहीर केले होते. जिल्हा प्रशासनाने दोन लाखांचा धनादेश हरयाणा पीडित अनुदान योजनेतून दिला होता. आम्हाला धनादेश नको. माझ्या मुलीची ही किंमत आहे असा त्याचा अर्थ होतो आम्हाला धनादेश नको न्याय हवा आहे, असे तिच्या आईने म्हटले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button