breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

वुड्स विले येथील चेंबरचे काम पूर्ण; परशुराम आल्हाट यांची कार्यतत्परता!

– परिसरातील स्थानिक नागरिकांनी मानले आभार

– अधिकाऱ्यांच्या मदतीने रस्त्याच्या कामालाही दिली गती

पिंपरी । प्रतिनिधी

मोशी येथील वुड्स विले येथील रस्त्यावर चेंबरची दुरूस्ती करण्याबाबत शिवसेनेचे भोसरी विधानसभा समन्वयक परशुराम आल्हाट यांनी तात्काळ पाठपुरावा केला. महापालिका अधिकाऱ्यांच्या मदतीने संबंधित चेंबरची दुरूस्ती करण्यात आली. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी आभार व्यक्त केले आहेत.

वुड्स विले फेज- १ समोरील रस्त्यावर गेल्या अनेक दिवसांपासून चेंबर नादुरूस्त झाले होते. रस्त्याच्या मध्यभागीच चेंबर असल्यामुळे अनेकदा लहान-मोठे अपघात झाले आहेत. याबाबत स्थानिक नागरिकांनी परशुराम आल्हाट आणि शिवसेनेच्या भोसरी विधानसभेतील महिला संघटिका रुपाली आल्हाट यांना निवेदन दिले होते. याबाबत आल्हाट यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी तात्काळ संपर्क साधला आहे. अवघ्या दोन दिवसांत चेंबर दुरूस्तीचे काम मार्गी लावण्यात आले.

विशेष म्हणजे, वुड्स विले फेज- १ येथील रस्त्याचे कामही दोन-तीन दिवसांत मार्गी लावण्यात येईल, असे आश्वासन प्रशासनाने दिले आहे.

प्लाझ्मादान करुन जपली सामाजिक बांधिलकी…

कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी परशुराम आल्हाट यांनी गेल्या सात महिन्यांपासून विविध उपक्रम हाती घेतले आहेत. तसेच, लॉकडाउनकाळात गरजू नागरिक, पोलीस आणि कोरोना योद्धयांना मदतही केली आहे. या काळात नागरिकांच्या मदतीसाठी धावून जाणारे आल्हाट दांम्पत्य कोरोनाबाधित झाले. पण, कोरोनावर यशस्वीपणे मात करीत परशुराम आणि रुपाल्ही आल्हाट नागरिकांच्या सेवेसाठी पुन्हा सक्रीय झाले आहेत. विशेष म्हणजे, कोरोनावर यशस्वी मात केल्यानंतर परशुराम आल्हाट यांनी प्लाझ्मादान करुन सामाजिक बांधिलकी जपली आहे. तसेच, प्लाझ्मादान करुया… एक जीव वाचवूया…असा संदेशही दिला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button