breaking-newsमहाराष्ट्र

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ७ लाख ३ हजार ८२३ वर

  • मुंबईत ५८७, पुण्यात १,२२८ नवे रुग्ण

मुंबई – संपूर्ण देशासह महाराष्ट्र राज्यालाही अद्याप कोरोना विषाणूचा विळखा कायम आहे. राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होतच आहे. मंगळवारी राज्यात १० हजार ४२५ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले. तर ३२९ रुग्णांनी कोरोनाशी लढताना आपले प्राण गमावले. यासह राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ७ लाख ३ हजार ८२३ वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा २२ हजार ७९४ इतका झाला आहे.

एकीकडे राज्यातील रुग्णसंख्या सातत्याने वाढत असली तरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढत आहे. मंगळवारी नव्याने आढळलेल्या रुग्णांपेक्षा जास्त म्हणजेच १२ हजार ३०० रुग्ण बरे झाले आहेत. यासह राज्यात आतापर्यंत ५ लाख १४ हजार ७९० जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. तर १ लाख ६५ हजार ९२१ कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत.

महाराष्ट्राची राजधानी मुंबईत मंगळवारी दिवसभरात कोरोनाचे ५८७ नवे रुग्ण आढळून आले. तर ३५ रुग्णांचा मृत्यू झाला. तसेच दिवसभरात ८८३ जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली. यासह मुंबईतील एकूण कोरोना रुग्णसंख्या आता १ लाख ३७ हजार ६७८ वर पोहोचली आहे. यापैकी १ लाख ११ हजार ९६७ जणांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळविले आहे. तसेच ७ हजार ४७४ रुग्णांनी आपला जीव गमावला असून १७ हजार ९३८ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. दरम्यान, पुणे शहरात मंगळवारी १ हजार २२८ नवे रुग्ण आढळले. तर ३६ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button