breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

वीर सावरकारांप्रमाणे मलासुद्धा तुरूंगात टाकण्याचा प्रयत्न : कंगना रणौत

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत आणि तिची बहीण रंगोली चांडेल विरोधात मुंबईच्या वांद्रे पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवण्यात आली होती. १२४ अ सह विविध कलमांतर्गत कंगना विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावरून कंगणाने न्यायव्यवस्थे विरोधातही द्वेषपूर्ण आणि अवमान करणारे ट्वीट करत टीका केली होती. त्यानंतर मुंबईत्या एका वकिलाने कंगनाविरोधात गुरुवारी अंधेरी महानगर दंडाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली होती. कंगनाने कॅंडल मार्च गॅंग आणि अवॉर्ड वापसी गॅंगवर ही जोरदार टीका केली आहे. कंगनाने एकापाठोपाठ एक ट्विट करत वीर सावरकर, राणी लक्ष्मीबाई आणि नेताजी सुभाष चंद्र बोस यांची नावे घेत आपण तुरूंगात जायला तयार आहोत असेही म्हटले आहे.

https://twitter.com/KanganaTeam/status/1319489783207391232?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1319491397997662208%7Ctwgr%5Eshare_3%2Ccontainerclick_1&ref_url=https%3A%2F%2Fwww.headlinemarathi.com%2Fentertainment-news-marathi%2Ftrying-to-put-me-in-jail-like-savarkar-kangana-ranaut%2F
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button