breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

वीरमाता-पित्याने दिला वीरपुत्राच्या आठवणींना उजाळा

–  वीरपुत्र नितीन राठोड यांच्या माता-पित्याची चापेकर वाड्यास भेट
चिंचवड, ( महा ई न्यूज ) – पुलवामा जिल्ह्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शाहिद झालेले नितीन शिवाजी राठोड यांच्या आई सावित्री राठोड आणि वडील शिवाजी राठोड यांनी चिंचवड येथील क्रांतिकारक चापेकर वाड्याला भेट दिली. यावेळी वीरमाता-पित्याने वीरपुत्राच्या आठवणींना उजाळा दिला.
चिंचवड येथील चापेकर बंधूंचा वाडा ‘क्रांतीतीर्थ’ येथे राठोड दाम्पत्याने भेट दिली. यावेळी शाहिद जवान नितीन राठोड यांचे मामा भीका बाबू चव्हाण, क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे सहकार्यवाह रवींद्र नामदे, सदस्य अशोक पारखी, गतिराम भोईर, आसाराम कसबे, व्यवस्थापक सिद्धेश्वर इंगळे, कोषाध्यक्ष संजय कुलकर्णी, अतुल आडे, शुभदा साठे आदी उपस्थित होते.
शाहिद नितीन राठोड यांचे चारे पांगडा हे गाव आहे. या गावाचे नाव बदलून वीर पांगडा असे ठेवण्यात आले आहे. मुलाच्या शौर्यामुळे हा ऐतिहासिक बदल झाला आहे. अशा भावना वीरमाता-पिता यांनी व्यक्त केल्या.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button