breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

कुटुंबातील प्रत्येकाची प्रेरणा, आधार व आदर्श ही स्त्रीच असते – अश्विनी जगताप

  • प्रतिभा महिला प्रतिष्ठानच्या वतीने जागतिक महिला दिनाचे विविध कार्यक्रम

पिंपरी, ( महा ई न्यूज ) – कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची प्रेरणा, आधार व आदर्श ही स्त्रीच असते. प्रत्येक स्त्रीवर आपल्या परिवाराची जबाबदारी असते. म्हणूनच प्रत्येक स्त्रीने स्वतःमधील शक्ती ओळखली पाहिजे, असे प्रतिपादन प्रतिभा महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अश्विनी जगताप यांनी केले.

प्रतिभा महिला प्रतिष्ठानच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पिंपळेगुरवमध्ये महिलांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी मंजुषा वैधष ऐश्वर्या रेणुसे-जगताप, नगरसेविका चंदा लोखंडे, सीमा चौघुले, सविता खुळे, शुभांगी जगताप, पल्लवी जगताप, सुषमा कदम, रविना अंघोळकर, शुभांगी कदम, अदिती निकम, नगरसेवक हर्षल ढोरे, प्रभाग स्वीकृत सदस्य महेश जगताप, आदि उपस्थित होते.

अश्विनी जगताप म्हणाल्या, “प्रत्येक स्त्री त्या त्या परिवारातील मुख्य घटक असते. आज स्त्री अर्थार्जन सुद्धा करते. इतकेच नाही, तर ती मुलांचा अभ्यास, घरासाठी खरेदीही करते. स्त्री मुळेच कुटुंबाची एकात्मता राहते. सायकलच्या मागच्या चाकाप्रमाणे ती आपल्या परिवाराचा अधिक भार सहन करते. आपाल्या परिवारातील प्रत्येक व्यक्तीची प्रेरणा, आधार व आदर्श ही स्त्रीच असते. स्त्रियांमधील ईश्वरत्व कीर्ती, श्री, वाक्, स्मृती, मेधा, धृती, क्षमा या सात गुणांनी प्रकाशित होते. म्हणूनच प्रत्येक स्त्रीने स्वतःमधील शक्ती ओळखली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.”

यावेळी ऐश्वर्या जगताप-रेणुसे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. तसेच जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून खास महिलांसाठी पिंपळेगुरव ते मार्केटयार्ड या मार्गावरील तेजस्विनी बसचे उद्घाटन करण्यात आले. त्याचप्रमाणे देशाचे संरक्षण करणाऱ्या जवानांच्या पत्नी कमल पारले, मोनिका गुरव, बॉक्सिंगपटू प्रार्थना पवार, स्विमर कॅमिला पटनाईक, प्रा. किशोरी कासट, रोबोटिक्स सुवर्णपदक विजेत्या त्रिशा बंडेवार, खुशी बावसकर यांच्यासह परिसरातील गुणीजन महिलांचा विशेष गौरव करण्यात आला. खास महिलांसाठी लावणी नखऱ्याची हा रत्नमाला बागल यांचा कार्यक्रम झाला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगरसेविका उषा मुंढे यांनी केले. सूत्रसंचालन नामदेव तळपे यांनी केले. माऊली जगताप यांनी आभार मानले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button