breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

वीजेच्या लपंडावाने रावेतमधील नागरिक हैराण

वीज वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर आंदोलन करणार – नगरसेवक मोरेश्वर भोंडवे

पिंपरी – वीज वितरण कंपनीच्या निर्ढावलेल्या यंत्रणेकडून रावेतमधील वीजेचा सुरू असलेल्या लपंडावाकडे सातत्याने दूर्लक्ष केले जात असल्याने येथील कर्मचारी व अधिकार्‍यांच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा नगरसेवक मोरेश्वर भोंडवे यांनी दिला आहे. सातत्याने वीज गुल होत असल्याने वर्क फ्रॉम होम आणि शाळकरी मुलांच्या ऑनलाईन अभ्यासावर परिणाम होत असल्याचेही भोंडवे यांनी म्हटले आहे.

वीजेच्या लपंडावाबाबत भोंडवे यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, रावेत परिसरातील यश होम लाईफस्पेस, अ‍ॅक्वा ब्लू, सिल्वर ओक, भोंडवे एम्पायर, महालक्ष्मी सोसायटी, मरिना, यश होम नेक्स्ट, भूमी, एलिगन्स, नंदनगिरी, ट्रॉफीकार, सिल्वर गार्डेनिया, जी.के., संतोष ड्रीम, मंगलतिर्थ, आनंदबन या सोसायट्यांसह संपूर्ण शिंदे वस्ती परिसरात गेल्या दोन महिन्यांपासून सातत्याने वीजेचा लपंडाव सुरू आहे. याबाबत महावितरण कंपनीचे चौधरी आणि तळपे या दोन अधिकार्‍यांकडे तक्रारी नोंदविण्यात आल्या. मात्र हे दोन्ही अधिकारी नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत नसून वीजेच्या समस्येवर कोणताही तोडगा काढत नसल्याने नागरिक हैराण झाले आहेत.

सध्या या परिसरातील अनेकजण वर्क फ्रॉम होम करत आहेत. लाईट जात असल्याने त्यांच्या कामात सातत्याने अडथळा येत आहे. तर शाळाही सध्या ऑनलाईन सुरू आहेत. वीज जात असल्याने ऑनलाईन शाळेच्या शिक्षणावरही परिणाम होत आहे. या संपूर्ण प्रकाराबद्दल परिसरातील नागरिकांमध्ये मोठा असंतोष असून आठ दिवसांत वीजेचा प्रश्न मार्गी न लावल्यास महावितरणच्या कार्यालयाला टाळे ठोकले जातील तसेच कर्मचारी व अधिकार्‍यांना धडा शिकविला जाईल, असाही इशारा भोंडवे यांनी दिला आहे.

ऊर्जामंत्र्यांकडेही तक्रार करणार
स्थानिक पातळीवरील अधिकार्‍यांकडे तक्रारी केल्यानंतरही दखल घेतली जात नसल्यामुळे या अधिकार्‍यांची तसेच वीजेच्या समस्येबाबत ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे भोंडवे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button