breaking-newsक्रिडा

विश्वचषक फायनल्स नेमबाजी स्पर्धा :मनू भाकर, राही सरनोबत अंतिम फेरी गाठण्यात अपयशी

भारताची मनू भाकर आणि राही सरनोबत या युवा नेमबाजांना विश्वचषक फायनल्स नेमबाजी स्पर्धेत महिलांच्या १५ मीटर एअर पिस्तूल प्रकारात अंतिम फेरी गाठण्यात अपयश आले.

राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेती मनू हिने प्रीसिजन आणि जलद प्रकारात अनुक्रमे २९२ आणि २९१ गुण मिळवत पात्रता फेरीत एकूण ५८३ गुणांची कमाई केली. जर्मनीची डोरीन वेन्नेकॅम्प आणि ऑस्ट्रेलियाची एलेना गॅलियाबोव्हिच यांनीही प्रत्येकी ५८३ गुण मिळवले, मात्र सर्वाधिक वेळा अचूक १० गुण मिळवणारी जर्मनीची डोरीन अंतिम फेरीसाठी पात्र ठरली. डोरीनने २३ वेळा तर मनू आणि एलेना यांनी प्रत्येकी १७ वेळा अचूक १० गुणांचा वेध घेतला होता.

राही सरनोबत हिने मात्र सपेशल निराशा केली. आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणाऱ्या राहीला ५६९ गुणांसह तळाच्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. आता पुरुषांच्या २५ मीटर फायर पिस्तूल प्रकारात अनिष भानवाला भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button