breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

आमदार जगतापांची भीमगर्जना; भाजपाशिवाय मला दुसरा पक्ष दिसेना!

  • राष्ट्रवादीत जाणार असल्याचा अंदाज फसवा
  • आमदार लक्ष्मण जगताप यांचे स्पष्टीकरण  

पिंपरी, (महा ई न्यूज) – भाजपाचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप भाजपाला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे 2019 मधील लोकसभा निवडणूक लढविणार असल्याचा अंदाज एका एजन्सीने वर्तविला आहे. सर्वसामान्यांची दिशाभूल करण्यासाठी विरोधकांकडून असा चुकीचा प्रचार करण्यात येत असल्याचे आमदार जगतापांचे म्हणणे आहे. मुळात जगताप हे पिंपरी-चिंचवडच्या राजकारणातले बलाड्य नेतृत्व मानले जातात. म्हणून, त्यांच्या भूमीकेवर ब-याचजणांचे लक्ष लागलेले असते. एजन्सीने त्यांच्या राजकीय भवितव्याचा अंदाज वर्तविला असला तरी आमदारांनी मात्र, त्याला कडाडून प्रतिक्रिया दिली आहे. यापुढे कोणत्याही पक्षात न जाता भाजपासाठीच काम करणार, अशी भीमगर्जना त्यांनी केली आहे.

लोकसभेच्या 2019 मधील निवडणूक लढविण्याची आमदार जगताप यांची इच्छा आहे. मात्र, आमदार जगताप ऐनवेळी भाजपाला सोडून राष्ट्रवादीत प्रवेश करतील आणि मावळ लोकसभा निवडणूक राष्ट्रवादीतून लढतील, असा अंदाज सर्व्हे करणा-या काही संस्थांकडून व्यक्त करण्यात येत आहे. असे झाल्यास पिंपरी-‍चिंचवडमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी होतील. मोठ्या प्रमाणात राजकीय उलथापालथ होईल आणि भाजपाला मोठा झटका बसेल, असाही अंदाज व्यक्त करून त्याबाबत सोशल माध्यमांतून चर्चा रंगत आहे. मात्र, आमदार जगताप यांनी हे सर्व अंदाज चुकीचे असल्याचे सांगत आपण यापुढे भाजपातच राहणार आहोत, असे स्पष्टीकरण दिले आहे.

आमदार जगताप यांनी याबाबत प्रसिध्दीपत्रक दिले आहे. या पत्रकात नमूद केले आहे की, मी यापुढे कोणत्याही पक्षात प्रवेश करणार नाही. भाजपामध्येच राहून भाजपासाठीच शेवटपर्यंत कार्यरत राहणार आहे. माझ्या या पुढच्या सर्व निवडणुकाही मी भाजपातर्फेच लढणार आहे. त्यामुळे भाजपाला सोडचिठ्ठी देण्याचा प्रश्न उद्भवत नाही. पिंपरी चिंचवड शहरातून राष्ट्रवादी आणि अन्य पक्षही हद्दपार झाले आहेत. त्यामुळेच विरोधक अस्वस्थ झाले आहेत. त्या अस्वस्थतेतूनच माझ्या विरोधात अशा अफवा पसरविण्याचे काम सुरू आहे. माझ्या विरोधकांनी सर्वसामान्यांची दिशाभूल करण्यासाठी अशा काही चुकीच्या सर्व्हेंचा आधार घेतला आहे. चुकीचा प्रचार आणि प्रसार करणे त्यांचा नित्याचाच ‘उद्योग’ आहे. मात्र सर्वसामान्य नागरिकांनाही विरोधकांची ही खेळी माहीत झाली आहे. भाजपाच्या माध्यमातून शहरात विविध विकासकामे झपाट्याने होत आहेत. त्याच जोरावर भाजपाचा प्रचार आणि प्रसार सुरू आहे. सर्वसामान्यांपर्यंत भाजपाला पोहचविण्यात आम्ही यशस्वी होत आहोत. त्यामुळे विरोधकांचे धाबे दणाणले आहे. मी भाजपामध्ये शेवटपर्यंत राहणार असून यापुढच्याही सर्व निवडणुका भाजपातर्फेच लढविणार असल्याचे आमदार जगताप यांनी प्रसिध्दीपत्रकात नमूद केले आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button