breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजनमुंबईराजकारण

कंगनाने सोनिया गांधींचा उल्लेख करून केली विखारी टीका, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले…

मुंबई: बॉलिवूडची अभिनेत्री कंगना राणावत आणि शिवसेनेत चांगलाच ‘सामना’ रंगला. या प्रकरणात राष्ट्रवादीने शिवसेनेची बाजू घेत जास्त महत्त्व देऊ नये, असा सल्ला दिला होता. आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सूचक प्रतिक्रिया दिलेली आहे. मुंबईत पत्रकारांशी बोलत असताना बाळासाहेब थोरात यांनी मराठा आरक्षण प्रकरणावर आपली भूमिका मांडलेली आहे.

यावेळी पत्रकारांनी कंगना आणि शिवसेनेच्या वादावर प्रश्न विचारला असता बाळासाहेब थोरातांनी सावध प्रतिक्रिया दिलेली आहे. कंगना राणावत ही चंदीगडमध्ये पोहोचलेली आहे. ‘आपण इथं मोकळेपणाने फिरत आहे. मुंबईत सोनिया सेना आहे त्यामुळे दहशतीचे वातावरण आहे’, अशी टीका कंगनाने केलेली होती. या प्रश्नावर बाळासाहेब थोरात म्हणाले की, ‘हे जे काही प्रकरण आहे, त्यावर न बोललं बरं’ असं म्हणून थोरातांनी या प्रकरणावर जास्त बोलण्याचे टाळलेले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button