क्रिडाराष्ट्रिय

विराट बनला सांताक्लॉज…मुलांना दिले त्यांच्या आवडीचे गिफ्ट

अवघ्या चार दिवसांवर नाताळ सण आहे. प्रत्येक लहान मुलांना या सणाचे आकर्षण असत ते म्हणजे सांताक्लॉज. त्याच पार्श्वभूमीवर भारतीय संघाचा कर्णधार सांताक्लॉजच्या वेशात कोलकात्यामधील अनाथ आश्रमात पोहोचला आणि अनाथ मुलांना त्याने भेटवस्तू व खाऊचे वाटप केले.

सांताक्लॉजच्या रुपात विराटला पाहून मुलांच्या चेहर्‍यावर हास्य दिसून आले.नाताळच्या दिवशी आपल्याला भेटवस्तू आणि आवडीचा खाऊ देणाऱ्या सांताक्लॉजची लहान मुले वाट पाहत असतात. हा आनंद अनाथ मुलांनाही अनुभवता यावा, यासाठी सांताक्लॉजच्या रुपात विराट अनाथ आश्रमात पोहोचला. विराट कोहलीचा व्हिडीओ स्टार स्पोर्ट्स या वाहिनीने शेअर केला आहे. विराट या व्हिडिओत सांताक्लॉजच्या वेशात लहान मुलांसोबत मस्ती करताना दिसून येत आहे. विराटला एका मुलाने तुझी दाढी मला खूप आवडते असे सांगितले. हे ऐकून विराटलाही हसू आवरले नाही. हा नाताळ त्या मुलांप्रमाणे विराटसाठीही नक्कीच खास बनला .

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button