breaking-newsताज्या घडामोडीपुणे

पन्हाळा रोडवर ट्रॅक्स उलटली ; 15 मुलं जखमी

कोल्हापूर – कोल्हापुरातील पन्हाळा रोडवर शनिवारी (5 जानेवारी) ट्रॅक्स उलटल्याने अपघात झाला आहे. या अपघातात 15 मुलं जखमी झाली असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. गाडीतील सर्व मुलं मर्दानी खेळ खेळण्यासाठी जात असताना हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एका क्रूझरमधून 11 ते 14 वयोगटातील मुलं प्रवास करत होती. त्याच दरम्यान केरली परिसरात चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि गाडी रस्त्याशेजारी शेतात जाऊन पलटी झाली. अपघातात 15 जण जखमी झाले असून एकाची प्रकृती गंभीर आहे. अपघातातील जखमींना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button