breaking-newsपिंपरी / चिंचवड

विनापरवाना पिस्टल बाळगल्याप्रकरणी एका अल्पवयीन मुलाला घेतले ताब्यात

पिंपरी ( महा ई न्यूज ) – विनापरवाना पिस्टल बाळगल्याप्रकरणी 17 वर्षीय तरुणाला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याकडून एक गावठी पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे असा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

पिंपरी पोलीस ठाण्याचे तपास पथक पिंपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये गस्त घालत होते. त्यावेळी तीन गुन्ह्यांमध्ये फरार असलेला अल्पवयीन तरुण चिंचवड रेल्वे स्टेशन येथे आल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार पिंपरी पोलिसांनी स्टेशन परिसरात सापळा रचून तरुणाला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्याकडे एक गावठी पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे मिळून आली. पोलिसांनी हा ऐवज जप्त केला आहे.

ताब्यात घेण्यात आलेल्या तरुणावर पिंपरी पोलीस ठाण्यात दरोडा, जबरी चोरी, जबरी चोरी करताना इच्छापूर्वक दुखापत यांसारखे तीन गुन्हे दाखल आहेत. तसेच देहूरोड पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न आणि दरोडा यांसारखे गुन्हे दाखल आहेत.पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button