breaking-newsपिंपरी / चिंचवड

राष्ट्रवादी युवतीकडून आदर्श माता पुरस्कार 

पिंपरी ( महा ई न्यूज ) – दिवसभर कष्ट करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणार्‍या व आपल्या मुलांना जिद्दीतून शिकविणार्‍या मातांचा राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसच्या वतीने पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. एचए हायस्कूल येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या वेळी १५ गरिब महिलांना आदर्श माता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
या वेळी राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसच्या शहरअध्यक्षा वर्षा जगताप, गंगा धेंडे, सविता खराडे, शिल्पा बिडकर आदींसह एचए हायस्कूलचे प्राचार्य व शिक्षक या वेळी उपस्थित होते.
पिंपरी-चिंचवड शहरात अनेक महिला दिवसभर कामे करून आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाह करतात. या बरोबरच आपल्या पाल्यांच्या शिक्षणासाठीही ते प्रयत्नशील असतात. नवरात्रउत्सवात विविध कार्यक्रम आयोजित करून पैसे खर्च केले जातात. मात्र धुणी-भांडी करून आपल्या पाल्यांना जिद्दीने शिकविणार्‍या मातांकडे दुर्लक्ष केले जाते. त्यांचा सत्कार करणे गरजेचे आहे. त्यामुळे पुढेही त्यांना प्रेरणा मिळेल, असा उद्देश ठेवून राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसकडून या पुरस्काराचे आयोजन केले. या वर्षी १५ महिलांना आदर्श माता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दरवर्षी या पुरस्काराचे आयोजन केले जाणार असल्याचे या वेळी वर्षा जगताप यांनी सांगितले.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button