breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

शांत-संयमी संजोग वाघेरे-पाटीलसुद्धा अचानक घसरले; भाजपा आमदार गोपीचंद पडळकरांची थेट ‘लायकी’ काढली!

पिंपरी । महाईन्यूज । प्रतिनिधी

शांत आणि संयमी अशी ओळख असलेले राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील अचानक घसरले आहेत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर असभ्य भाषेत टीका केल्यानंतर भाजपा आमदार गोपिचंद पडळकर यांना जशास तसे उत्तर देताना वाघेरे-पाटलांची पडळकरांची थेट ‘लायकी’ काढली. विशेष म्हणजे, पडळकरांचा ‘बाप’ काढल्यामुळे वाघेरे-पाटील खरंच शांत-संयमी आहेत का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

विशेष म्हणजे, राज्यपाल नियुक्त १२ जागांवर संधी मिळण्यासाठी वाघेरे-पाटील इच्छुक आहेत. जोरदार मोर्चेबांधणी करीत आहेत. त्यांना संधी मिळावी, अशी समर्थकांची अपेक्षा आहे. पण, या निवडणुकीचे वारे वाहू लागल्यानंतर शांत आणि संयमी असलेले वाघेरे-पाटील भलतेच आक्रमक झाले आहेत.

वास्तविक, पिंपरी-चिंचवडमधील स्थानिक मुद्दांवर महापालिका अर्थात शहरातील सत्ताधारी भाजपाविरोधात रान पेटवणे अपेक्षीत असताना वाघेरे-पाटील कधी भाजपा नेते किरीट सोमय्या, तर राम कदम यांना लक्ष करण्यात व्यस्त आहेत. आता पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवारांवर टीका झालेली वाघेरे-पाटलांना सहन झाली नाही.      

वाघेरे- पाटील म्हणतात की, धनगर समाजाच्या आरक्षणावरून भाजपने आमच्या बापाचा अपमान केला म्हणत लोकसभा निवडणुकीत गोपीचंद पडळकर यांना वंचित आघाडीतून वंचित रहावे लागले.  त्यानंतर विधानसभा निवडणुकीत ज्याच्या हातून गळ्यात पट्टा घालून अजित दादांंसमोर दंड थोपटले, त्याहीवेळी बारामतीकरांनी त्यांना त्याची लायकी दाखवली. तर पवार साहेबांचं राजकारण संपलं अशा म्हणणाऱ्या फडणवीस यांनाही पवारसाहेब बापमाणूस आहेत. याचा साक्षात्कार झाला. त्या फडणवीसांच्या जीवावर पोपटासारखे बोलणाऱ्या पडळकर यांनी स्वतःची लायकी तपासून टीका करावी.

ज्यांचा गळ्यात पट्टा घातला आहे..त्यांनी काय केले?

तसेच, धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरून उदयास आलेल्या पडळकर यांना बारामतीमधील धनगर समाजाने त्यांची जागा दाखवून दिली आहे.  त्यांना फक्त धनगर समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नाचं राजकारण करायचं आहे. ज्या भाजपात ते सध्या आश्रयी आहेत, त्या भाजपाने 2014 च्या विधानसभा निवडणुकीत पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला आरक्षण देतो असे जाहीर केले होते. त्यांनी पाच वर्षे धनगर समाजाला खेळवलं. आता सत्तेवरून गेल्यानंतर महाविकास आघाडीच्या विरोधात व ज्यांच्यावर बोलण्याची लायकी नाही त्यांच्यावर टीका करण्यास नव्या वाचाळवीर पडळकर यांना माध्यमांसमोर उलटसुलट प्रतिक्रिया देत आहेत. त्यामुळे ज्यांच्या गळ्यातील पट्टा घातला आहे त्या भाजपने त्यांच्या समाजासाठी काय केले याची माहिती तपासावी, असा प्रतिसवाल संजोग वाघेरे-पाटील यांनी भाजपच्या गोपीचंद पडळकर यांना केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button