breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमुंबई

विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी नरहरी झिरवाळ

मुंबई – काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने आता विधानसभेचे हंगामी अध्यक्षपद नरहरी झिरवाळ यांच्याकडे सोपवण्यात आले आहे.नरहरी झिरवळ हे शरद पवारांचे निष्ठावान कार्यकर्ता म्हणून ओळखले जातात. ते नाशिकमधील दिंडोरीचे आमदार आहेत. अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीसांच्या साथीने उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, त्यावेळी झिरवाळ बेपत्ता झाले होते. काही दिवसांनंतर नरहरी झिरवाळ शरद पवार यांच्या दिल्लीतील 6 जनपथ या निवासस्थानी दिसले, तेव्हा ‘माझी छाती फाडली तरी पवारसाहेब दिसतील’ असं भावनिक उत्तर देऊन झिरवाळ यांनी त्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्यांची तोंडं बंद केली होती.

शरद पवार साहेब हे माझं दैवत आहेत. त्यांनी मला पाचव्यांदा उमेदवारी दिली. आधी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पराभव होऊनही त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला, त्यामुळे मी विश्वासघात करणार नाही, असं झिरवाळ म्हणाले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button