breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

विधानसभा निवडणुकीत काॅंग्रेस ‘वंचित’ला सोबत घेणार

मुंबई – लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसने स्वतंत्र्यपणे निवडणूका लढल्यामुळे ९ जागांवर काँग्रेसला फटका बसला होता. विधानसभेत याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी महाराष्ट्राच्या नेत्यांना वंचितला सोबत घेण्याच्या सूचना केल्या आहे. ३ जुलैपासून माणिकराव ठाकरे, हर्षवर्धन पाटील ‘वंचित’च्या नेत्यांशी जागावाटपाची चर्चा करणार आहे. परंतु, वंचित बहुजन आघाडीची भूमिका काय असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी सर्व पक्ष तयारीला लागले आहे. शिवसेना, भाजपाची युती जवळपास निश्चित झालेली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचीही आघाडी जवळपास निश्चित मानली जात आहे. काँग्रेस महाआघाडीसोबत सर्व समविचारी पक्षांना सोबत घेण्यासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. दिल्ली येथे काँग्रेस अध्यश्र राहुल गांधी यांनी राज्यातील काँग्रेस नेत्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीमध्ये विजय वडेट्टीवार, शरद रणपिसे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, माणिकराव ठाकरे, हुसेन दलवाई आदी नेते उपस्थित होते. यावेळी विधानसभेबाबत काय रणनिती असणार यावर सखोल चर्चा झाली.

लोकसभा निवडणुकीत ‘वंचित’मुळे मुस्लीम व दलित मतदारांचे काँग्रेस,राष्ट्रवादी आणि वंचित असे विभाजन झाले. याचा फटका काँग्रेस महाआघाडीसह वंचितलाही बसला. या बाबतही सविस्त चर्चा दिल्लीतल्या बैठकीत झाली. त्यानंतर राहुल गांधी यांनी सर्व समविचारी पक्षांसोबत चर्चा करण्याच्या सूचना महाराष्ट्रातील काँग्रेसनेत्यांना केल्या.

वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्यासाठी काँग्रेसचे नेते याबाबत प्रकाश आंबेडकरांशी चर्चा करणार असल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे प्रकाश आंबेडकर यांच्यापासून कसा प्रतिसाद मिळतो यावर बरेच काही अवलंबून आहे. काँग्रेस महाआघाडीसोबत सध्या स्वाभिमानी शेतकरी संघटना, रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (कवाडे व गवई गट) सोबत आहे. आता वंचित बहुजन आघाडीकडून कसा प्रतिसाद मिळतो याकडे सर्वांचे लक्ष लागले

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button