breaking-newsआंतरराष्टीय

गाडी चालवताना पावसाचे फोटो काढल्यास १६ हजार रुपये दंड

गाडीतून प्रवास करत असताना अचानक पाऊस येतो आणि मग अनेकांना त्या पावसाचे फोटो काढण्याचा मोह आवरता येत नाही. मात्र आता गाडीमधून पावसाचे फोटो काढणे खरोखरच महागात पडू शकते. कारण गाडीमधून पावसाचे फोटो काढण्याच्या नादात रस्ता सुरक्षेकडे दूर्लक्ष करणाऱ्यांना मोठ्या रकमेचा आर्थिक दंड करण्याचा निर्णय आबूधाबी पोलिसांनी घेतला आहे.

दुबईमधील आबूधाबी पोलीस खात्याने यासंदर्भात चालकांना सुचना केल्या आहेत. दुबईमध्ये हिवाळ्यामध्ये पाऊस पडतो. पावसाळ्याचे दिवस सुरु होत असून पावसाळ्यामध्ये गाड्या संभाळून चालवण्याचे आवाहन पोलिसांनी सर्वांना केले आहे. दुबईमध्ये मागील काही दिवसांमध्ये वादळांमुळे दोन ते तीन वेळा हलक्या स्वरूपाचा पाऊस पडल्याच्या पार्श्वभूमीवर या सूचना पोलिसांनी दिल्या आहेत.

दुबईमध्ये पुढील दोन आठवड्यांमध्येच हिवाळा दाखल होईल. मात्र त्याआधीच काही दिवस देशातील विविध भागांमध्ये पावसाच्या सरी कोसळतील असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. वातावरणातील बदलांमुळे वाहतुकीच्या नियंमांचे उल्लंघन करण्याचे प्रमाण वाढण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. त्यातही गाडी चालवताना फोटो घेण्यासाठी मोबाइलचा वापर करणाऱ्याचे प्रकार वाढतील असे पोलिसांना वाट आहेत. त्यामुळे पोलिसांनी थेट चालकांना यासंदर्भात सतर्क राहण्यास सांगितले आहे. तसेच पावसामध्ये गाडी चालवताना मोबाइलवरून फोटो काढू नये असेही पोलिसांनी सांगितले आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून ८०० दीऱ्हाम (म्हणजे आजच्या दरानुसार भारतीय चलनात जवळजवळ १६ हजार रुपये) दंड आकारण्यात येईल. तसेच त्यांना चार ब्लॅक पॉइण्ट देण्यात येतील.

दुबईतील वाहतुकीच्या नियमांप्रमाणे गाडी चालवताना मोबाइल वापरणे हा कायद्याने गुन्हा आहे. देशातील रस्ते आणि वाहतूक प्राधिकरणाच्या आकडेवारीप्रमाणे गाडी चालवातना फोनवरुन टेक्सिंग करत असल्यास अपघात होण्याची शक्यता ३२ टक्क्यांनी वाढते. फोन वापरत गाडी चालवणाऱ्या चालकाचा प्रतिसाद देण्यासंदर्भातील सुचकता ५० टक्क्यांनी कमी होते. तर १० टक्क्यांहून अधिकवेळा लेन कटिंगचा प्रकार होतो. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, दुबईतील एकूण अपघातांपैकी ५० अपघात हे तरुण चालक गाडी चालवताना मोबाइलवर सोशल नेटवर्किंग साईट्सवर अॅक्टीव्ह असल्याने होतात असं पोलिसांच्या निरिक्षणातून समोर आले आहे.

दुबईमधील चालकांसाठीचे मोबाइलचे नियम

गाडीमध्ये बसताना चालकाने मोबाइल सायलेन्टवर टाकणे गरजेचे आहे. पण जर चालकाचा एखादा आप्तकालीन कॉल करायचा असल्यास त्याने पोलिसांनी आखून दिलेल्या नियमांमध्ये राहूनच हा कॉल करणे बंधनकारक आहे. गाड्यांमधील हॅण्ड्स फ्रीची सोय वापरून फोन करावा किंवा गाडी बाजूला घेऊन फोन करावा असे पोलिसांची नियमावली सांगते. तसेच रस्त्यावरून चालणाऱ्या पादचाऱ्यांनेही मोबाइल वापरून नये. चालताना मोबाइल वापरत असल्यास पादचाऱ्यांचे रस्त्यावरील लक्ष विचलीत होण्याची शक्यता असते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button