breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्र

धक्कादायक! बायकोशी भांडण करून स्वतःच पेटवलं घर; सिलेंडरचा स्फोट झाल्यानं भडकली आग

सोलापूर |

सोलापुरातील अंबिका नगर, नक्का वस्ती येथील राहत्या घरात पत्नीला मारहाण करून हाकलून दिल्यानंतर स्वतःच्या घराला पतीने आग लावल्याचा प्रकार समोर आला आहे. या आगीत घरातील सर्वच साहित्य जळून खाक झालं असून जवळपास दोन लाखांचे नुकसान झालंय. श्यामसुंदर भंडारी असं घर पेटवून देणाऱ्या पतीच नाव आहे. या आगीमध्ये घरातील गॅसच्या टाकीचा स्फोट झाल्याने ही आग धुमसतच होती, मात्र योग्यवेळी अग्निशामक दलाच्या गाड्या दाखल झाल्याने आग आटोक्यात आणण्यात यश आले, त्यामुळे मोठी दुर्घटना होताना टाळली.

गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या घरात चार-पाच दिवसांपासून भांडण सुरू होतं. एकेदिवशी श्यामसुंदर भंडारीने पत्नीला मारहाण करून हाकललं आणि त्यानंतर घराला आग लावली. हा व्यक्ती घरात आग लागून निघून गेला, त्यानंतर गॅस सिलेंडरचा स्फोट झाला आणि परिसरात खळबळ उडाली, असं शेजाऱ्यांनी सांगितलं. दरम्यान, भंडारी यांच्यामुळे घरातील लोकांना त्रास होत असल्याची तक्रार शेजाऱ्यांनी दिली. त्यांच्या घरातील भांडणाचा त्रास होत असून तो पत्नी आणि मुलांना मारहाण करत असल्याचं शेजाऱ्यांनी सांगितलं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button