breaking-newsमहाराष्ट्र

विधानपरिषदेवरील भाजपचे नवनिर्वाचित आमदार रमेश कराड यांच्यावर गुन्हा

बीड : विधानपरिषदेवरील भाजपचे नवनिर्वाचित आमदार रमेश कराड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीडमध्ये गोपीनाथ गडावर सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन केल्याप्रकरणी कराड यांच्यासह 22 जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

भाजप आमदार रमेश कराड यांनी परळी तालुक्यातील गोपीनाथ गड येथे भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी यांचा आदेश झुगारुन जमाव करत सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे.

रमेश कराड यांनी गोपीनाथ गड येथे पोलीस प्रशासनाला कसलीही पूर्वकल्पना न देता अचानक दर्शनाला येऊन जमाव गोळा केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. रमेश कराड यांच्यासह 22 जणांवर परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button