breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्र

#waragaintcorona: बातमी प्रसिद्ध केल्याच्या रागातून पत्रकारास धमकी देणाऱ्यावर पोलिसांकडून गुन्हा दाखल

दहिवडी (सातारा) । महाईन्यूज । प्रतिनिधी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी सुरु असताना विनापरवाना बुध ता. खटाव येथे तळेगाव दाभाडे (पुणे) येथून आल्याने इक्बाल कादर शेख व त्याच्या पत्नीवर आपत्ती व्यवस्थापन कायद्या अंतर्गत पुसेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याची बातमी प्रसिद्ध केल्याचा राग मनात धरून दैनिक ‘प्रभात’चे पुसेगाव प्रतिनिधी प्रकाश राजेघाटगे यांना मारहाण करण्यात आली आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी, बुध ता. खटाव येथील रहिवासी आमिर शमशुद्दीन शेख व त्याचा भाऊ जहांगीर शमशुद्दीन शेख यांनी पत्रकार प्रकाश राजेघाटगे(रा. बुध) यांच्या घरात जाऊन नातेवाईकांवर गुन्हा नोंद झाल्याची बातमी छापल्याचा जाब विचारात लाथाबुक्यांनी मारहाण करत शिवीगाळ केली व जीवे मारण्याची धमकी दिली. “या हल्ल्याप्रकरणी पुसेगाव पोलीस ठाण्यात यासंदर्भात पत्रकार संरक्षण कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल झाला असून,कोरोना पार्श्वभूमीवर मा.न्यायालयाच्या निकषानुसार दोषींवर कारवाई करण्यात आली असल्याचे”

पुसेगाव पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांनी सांगितले.

एनयुजेएम सातारा सचिव असणा-या प्रकाश राजेघाटगे यांचे सह जिल्हा कार्याध्यक्ष डाँ विनोद खाडे ,आणि जिल्हाध्यक्ष रूपेश कदम यांनी या कारवाईबद्दल पोलीसांचे आभार मानले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button