breaking-newsताज्या घडामोडीपुणे

विजयसिंह मोहिते पाटलांना दिला शह, भाजपचे उत्तमराव जानकर मैदानात

मुंबई – विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून अनेक उमदेवारांनी आपला अर्ज भरण्यास सुरुवात केली आहे. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. यामध्ये बेरजेचं राजकारण करत दुसऱ्या पक्षातील काही नेत्यांनाही संधी दिल्याचं दिसत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने माळशिरस येथून धनगर समाजाचे नेते उत्तमराव जानकर यांना संधी दिली आहे. जानकर हे भाजपच्या जवळचे म्हणून ओळखले जातात. पण विजयसिंह मोहिते पाटील राष्ट्रवादीतून भाजपच्या जवळ गेल्याने त्यांना शह देण्यासाठी राष्ट्रवादीने जानकरांना आपल्याकडे खेचलं आहे. त्यामुळे या मतदारसंघात भाजपसमोर आव्हान निर्माण झालं आहे.

उत्तमराव जानकर आणि लोकसभा निवडणूक

धनगर समाजाचे नेते उत्तम जानकर हेदेखील माढ्यातून लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता निर्माण झाली होती. पण मी निवडणूक लढवणार नसून युतीच्या उमेदवाराला म्हणजेच रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पाठिंबा देणार असल्याची घोषणा नंतर उत्तम जानकर यांनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात केली होती.

‘माढ्यात भाजपच्या रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि राष्ट्रवादीच्या संजय शिंदे यांच्यामध्ये लढत झाली. माढा लोकसभा मतदारसंघात धनगर समाजाची चार लाख मते आहेत. त्यामुळे उत्तम जानकर यांचा पाठिंबा भाजपसाठी फायद्याचा ठरणार ठरला होता. त्यामुळे आता राष्ट्रवादीने खेळी खेळत उत्तम जानकर यांना आपल्याकडे खेचलं आहे. याचा राष्ट्रवादीला किती फायदा होतो, हे पाहावं लागेल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button