breaking-newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

वाहन परवान्याची संगणकीकृत चाचणी कठीणच

पुणे | महाईन्यूज

  • तूर्त संगणकीकृत मार्गावरच चाचणी

वाहन चालक प्रशिक्षण आणि संशोधन संस्थेच्या (आयडीटीआर) अत्याधुनिक संगणकीकृत आणि कठीण मार्गावर मोटार चालविण्याच्या परवान्यासाठी चाचणी देताना अनेकजण नापास होत असल्याने या मार्गाचा पुणेकरांनी धसका घेतला आहे. मात्र, परवाना मागणाऱ्यांची संख्या अधिक असल्याचे कारण देत आरटीओने काही दिवसांपूर्वी फुलेनगर येथील साधा चाचणी मार्ग पुन्हा सुरू केला. त्यामुळे चाचणीच्या रांगेत असणाऱ्यांना मनोमन बरे वाटत असतानाच या मार्गावरील चाचणी स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने पुणेकरांना आता पुन्हा कठीण चाचणीला सामोरे जावे लागणार आहे.

पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयातून मोटार चालविण्याचा पक्का परवाना मिळविण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करणाऱ्या सर्वाची वाहन चालविण्याची चाचणी कासारवाडी येथील आयडीटीआरच्या चाचणी मार्गावर घेतली जात होती.

हा चाचणी मार्ग सर्वोत्तम असला, तरी त्याची क्षमता कमी असल्याबाबत सातत्याने तक्रारी करण्यात येत होत्या. पुणे शहरात वाहनांची संख्या वाढत असतानाच वाहन चालविण्याचा परवाना मागणाऱ्यांची संख्याही सातत्याने वाढत आहे. सध्या दररोज सुमारे सहाशे जणांकडून शिकाऊ परवान्याची मागणी केली जाते. पक्का परवाना मागणाऱ्यांची संख्याही जवळपास तितकीच आहे. मात्र, आयडीटीआरच्या चाचणी मार्गावर सध्या दररोज ३२० जणांचीच चाचणी घेतली जाते. त्यामुळे अनेकांना पक्क्या परवान्यासाठी चाचणी देण्यास आणि प्रत्यक्ष परवाना मिळण्यास दीर्घ प्रतीक्षा करावी लागते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button