breaking-newsराष्ट्रिय

वाहन तपासणीला नकार देणाऱ्या भाजपाच्या विभागप्रमुखाला पोलिसांची बेदम मारहाण

उत्तर प्रदेशमधील कानपूरमध्ये वाहनांची तपासणी सुरु असताना पोलिसांनी भाजपाचे कनापूरमधील विभागप्रमुख देवेंद्र राजपूत यांची दुचाकी थांबवली. त्यावेळी राजपूत आणि पोलिसांदरम्यान बाचाबाची झाली. त्यानंतर संतापलेल्या पोलीस निरीक्षकाने राजपूत यांना मारहाण केली. या प्रकरणात निरीक्षकाला निलंबित करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेलेल्या माहितीनुसार राजपूत यांना पोलिसांनी तपासणीसाठी थांबवले असता त्यांनी पोलिसांशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. ‘मी पोलिसांना माझी ओळख सांगितल्यानंतरही त्यांनी मला थांबवल्याने वाद सुरु झाला,’ असं राजपूत यांनी सांगितलं आहे. तर राजपूत यांच्याकडे कागपत्रांची मागणी केली त्यावरुन त्यांनी हुज्जत घालण्यास सुरुवात केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. राजपूत आणि पोलीस अधिकारी धर्मेंद्र यादव यांच्यामधील शाब्दिक वाद हाणामारीपर्यंत गेला. दोघे एकमेकांना मारु लागल्यानंतर पोलीस कर्मचारी आणि रस्त्यावरुन जाणाऱ्यांना त्यांच्यामध्ये पडून वाद सोडवावा लागला.

  • नक्की काय घडले

राजपूत ते आपल्या दुचाकीवर दूध आणण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांना मटौली पोलीस स्थानकाच्या हद्दीतील उड्डाणपूलाखाली पोलीस निरीक्षक धर्मेंद्र यादव यांच्या नेतृत्वाखाली काही पोलीस हवलदार वाहनांची तपासणी करत होते. या ठिकाणी राजपूत यांना तपासणीसाठी थांबवण्यात आले असता त्यांनी पोलिसांशी वाद घालण्यास सुरुवात केली. पोलिसांशी वाद सुरु झाल्यानंतर राजपूत यांनी फोन करुन पक्षाच्या कार्यकर्त्यांनाही गोळा करण्याचा प्रयत्न केला होता, असं पोलिसांचं म्हणणं आहे.

वादावादी झाल्यानंतर या दोघांमध्ये रस्त्यावरच हणामारी सुरु झाली. धर्मेंद्र यांनी राजपूत यांना बेदम मारहाण केली. यामुळे तेथे जमलेल्या भाजपाच्या कार्यकर्त्यांनी बराच गोंधळ घातला. राजपूत यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना सीएससी रुग्णालयात दाखल करण्यात आले. राजपूत हे पेशाने डॉक्टर असून ते भाजपाचे मंडल अध्यक्ष असून शहरातील पक्षाच्या कामामध्ये सक्रिय सहभाग घेतात. ते राज्यमंत्री अजीत पाल यांचे निकटवर्तीय असल्याचे मानले जाते.

  • निलंबन…

‘धर्मेंद्र यांनी लोकप्रतिनिधी आणि नेत्यांबद्दल अपशब्द वापरत माझ्या पतीला बेदम मारहाण केली,’ असा आरोप राजपूत यांची पत्नी संध्या यांनी केला होता. या प्रकरणाची चौकशी पोलिसांनी सुरु केली आहे. तसेच या प्रकरणामध्ये पोलीस निरीक्षक धर्मेंद्र यादव यांना निलंबित करण्यात आले आहे. तसेच या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस अधीक्षकांकडे सोपवण्यात आला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button