breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

#waragainstcorona : बांधकाम कामगारांना मिळाले दोन हजार रुपये कष्टकरी संघर्ष महासंघाचे प्रयत्नाला यश

पिंपरी । महाईन्यूज । प्रतिनिधी

करोना च्या लॉक डाऊन काळात असंघटित कामगारांची बिकट अवस्था झाली असून  हाताला काम नाही आणि मजुरी, पगारही नाही अशी अवस्था असताना या संकटाच्या काळात महाराष्ट्र राज्य कामगार मंडळाकडून

 नोंदणीकृत बांधकाम कामगारांना प्रत्येकी दोन हजार जमा झाले याचे बँक खात्यावर रक्कम जमा झाल्याचे दाखवत  कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र कडून हार्दिक स्वागत करण्यात आले. तसेच उर्वरित कामगारांना हि  लवकरात लवकर  रक्कम मिळावी अशी अपेक्षा  व्यक्त करण्यात आली .

यावेळी  कष्टकरी संघर्ष महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते, प्रदेश उपाध्यक्ष राजेश माने, अनिल बारवकर, नाना कसबे, उमेश डोर्ले, निरंजन लोखंडे आदी उपस्थित होते

कोरोना या विषाणूच्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या स्थितीत राज्य व केंद्र शासनाकडून लॉकडाऊन १८ मे २०२० पर्यंत घोषित करण्यात आलेला आहे. लॉकडाऊन कालावधीत राज्यातील इमारत व इतर बांधकामे बंद झाली असल्याने बांधकाम कामगारांना दररोज रोजगार मिळत नाही. त्यामुळे दैनंदिन जीवनातील मूलभूत गरजा भागविण्यासाठी कामगारांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. याच पार्श्वभूमीवर मंडळाकडील नोंदीत सक्रिय बांधकाम कामगारांना दोन हजार रुपये एवढे आर्थिक सहाय्य थेट बांधकाम कामगाराच्या बँक खात्यात डीबीटी (DBT) पद्धतीने जमा करण्यात आले आहे.

 राज्यातील १२ लाखांपेक्षा अधिक नोंदीत बांधकाम कामगारांना हा फायदा होणार  आहे. कष्टकरी संघर्ष महासंघाने    अडचणीमध्ये सापडलेल्या  कामगारांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, कामगार मंत्री  दिलीप वळसे- पाटील व राज्य मंत्री बच्चू कडु यांचेकडे मागणी केली होती. अडचणीच्या काळात बांधकाम कामगारांना दोन हजार रुपये मिळाल्यामुळे सध्या समाधानाचे वातावरण  आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button