breaking-newsराष्ट्रिय

वाराणसी उड्डाणपूल दुर्घटनेत 18 जणांचा मृत्यू

वाराणसी : वाराणसीमध्ये उड्डाणपुलाचा भाग कोसळून मोठी दुर्घटना घडली. यामध्ये 18 जणांचा मृत्यू झाला आहे. तर तीन जणांना वाचवण्यात आलं आणि अनेक जण जखमी आहेत.

वाराणसीतील कँट स्टेशनजवळ उड्डाणपुलाचा स्लॅब कोसळून अनेक गाड्या दबल्या गेल्या, तर यामध्ये तिथे असणारे अनेक लोकही दबले गेले. या निर्माणाधीन उड्डाणपुलाखालून मोठी वाहतूक होती. जो भाग गाड्यांवर कोसळला, तो भाग दोन महिन्यांपूर्वीच ठेवण्यात आला होता. मात्र तो लॉक करण्यात आलेला नव्हता, असं प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपये मदत देण्याची घोषणा केली आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button