breaking-newsराष्ट्रिय

नन बलात्कार प्रकरण: ‘प्रसारमाध्यमांच्या दबावामुळेच बिशप फ्रँकोला अटक’

केरळ येथील नन बलात्कार प्रकरणात बिशप फ्रँको मुलक्कलला जी अटक करण्यात आली ती प्रसारमाध्यमांनी टाकलेल्या दबावामुळेच करण्यात आली असे म्हणत पुन्हा एकदा चर्च त्याच्या मदतीला धावून गेलं आहे. Christward या चर्चच्या मासिकात बिशप फ्रँको मुलक्कलची पाठराखण करण्यात आली आहे. बिशप फ्रँकोला १५ ऑक्टोबरला जामीन मंजूर करण्यात आला. त्यानंतर फ्रँको जालंधरला परतला. यावेळी त्याचे स्वागतही करण्यात आल्याचा उल्लेख या मासिकात करण्यात आला आहे. फ्रँको मुलक्कल परतला तेव्हा संध्याकाळी पाच वाजता होली मासचेही आयोजन करण्यात आले होते.

मीडिया अर्थात प्रसारमाध्यमांनी आणलेला दबाव आणि ननने बलत्काराचे आरोप केल्यावर इतर नन्सनी केलेले आंदोलन यामुळे वातावरण चांगलेच तापले होते. या सगळ्यात बिशप फ्रँको मुलक्कला अटक झाली. ही अटक फक्त प्रसारमाध्यमांचा दबाव आणि नन्सनी केलेल्या आंदोलनामुळे झाली असे मासिकात म्हटले आहे.

काही दिवसांपूर्वीच म्हणजेच २२ ऑक्टोबरला केरळ नन बलात्कार प्रकरणात फ्रँको मुलक्कल विरोधात जबानी देणाऱ्या फादरचाही मृत्यू झाल्याचे वृत्त आले होते. फादर कुरीयाकोसी हे २२ ऑक्टोबरच्या सकाळी जालंधर येथील चर्चच्या त्यांच्या खोलीत मृतावस्थेत सापडले. कुरियाकोसी यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्यासोबत काहीतरी चुकीचे घडले असावे असा संशय तेव्हाच व्यक्त केला होता. ‘द न्युज मिनिट’ने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

काय आहे प्रकरण?
२०१४ ते २०१६ या कालावधीत बिशप फ्रँको मुलक्कलने बलात्कार केल्याचा आरोप ननने केला होता ज्यामुळे चांगलीच खळबळ उडाली. अधिकाराचा गैरवापर करत बलात्कार केल्याचे या ननने म्हटले होते. याप्रकरणी वैद्यकीय तपासणी झाल्यावर आणि तीन दिवस चौकशी करण्यात आल्यावर पोलिसांनी फ्रँको मुलक्कलला अटक केली. या आरोपानंतर फ्रँको मुलक्कलला बिशप पदावरूनही हटवण्यात आले होते. मात्र काही दिवसांपूर्वीच त्याला जामीन मिळाला. आता त्यावेळी फ्रँकोला झालेली अटक मीडियाच्या दबावामुळे झाल्याचे म्हणत चर्चने त्याची पाठराखणच केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button