breaking-newsराष्ट्रिय
कर्नाटकात फोडाफोडी टाळण्यासाठी कॉंग्रेसच ‘रिसॉर्ट पॉलिटिक्स’
बंगळूरू : कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर फोडाफोडी टाळण्यासाठी काँग्रेसने ईगल्टन रिसॉर्टमध्ये १०० रुम बूक केल्या आहेत, जिथे काँग्रेसच्या आमदारांना ठेवलं जाईल. भाजपने काही पाऊल उचलण्याअगोदरच काँग्रेसने सावध भूमिका घेतली आहे.
कर्नाटकात सत्तेचा पेच निर्माण झाल्यानंतर भाजप, काँग्रेस आणि जेडीएसकडूनही सत्ता स्थापनेचा दावा केला जात आहे. कर्नाटकमधील भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार येडियुरप्पा यांनी आज विधीमंडळाची बैठक बोलावली आहे. या बैठकीत येडियुरप्पांची विधीमंडळ नेते म्हणून निवड होईल आणि त्याबाबतची माहिती राज्यपालांना दिली जाईल. मात्र, भाजपकडे बहुमतासाठी ८ जागांची कमी आहे.