breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘वायसीएम’ रुग्णालयात सत्तारुढ पक्षनेत्यांनी घेतली डाॅक्टरांची झाडाझडती

  • वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामकाजांचा घेतला आढावा
  • रुग्णालयातील सोयी-सुविधा वाढवण्याचे दिले आश्वासन

पिंपरी ( महा ई न्यूज ) – महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयास आज (बुधवार) सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी भेट दिली. वायसीएम रुग्णालयांची पाहणी करुन डाॅक्टर, परिचारिका यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. तसेच वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामकाजाची सध्यस्थिती जाणून घेतली. याशिवाय रुग्णांची पिळवणूक करणा-या आणि कामचुकार डाॅक्टरांसह कर्मचा-यांची गय करणार नसल्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला.

यावेळी नगरसेविका सुजाता पालांडे, सुलक्षणा शिलवंत धर, वायसीएम वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डाॅ. राजेंद्र वाबळे, मेडीसीनचे डाॅ. प्रवीण सोनी यांच्यासह डाॅक्टर, कर्मचारी उपस्थित होते.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वायसीएम रुग्णालयात औषधांचा पुरेशा साठा नाही. कुत्रा चावल्यानंतर रुग्णांसाठी रेबीज लस उपलब्ध नाही. काही विभागात डाॅक्टर, परिचारिका, आया, वाॅर्डनची संख्या अपुरी आहे. रुग्णालयांच्या विविध विभागात तज्ञ डाॅक्टर ओपीडीदरम्यान उपस्थित नसतात. त्यामुळे रुग्णांची मोठ्या प्रमाणात हेळसांड होवू लागली आहे.

याबाबत सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी वायसीएम वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामकाजाची सध्यस्थिती जाणून घेतली. तसेच महाविद्यालयाचे ग्रंथालय, विद्यार्थी वाचन कक्ष, रुग्णांच्या शरीराचे अवयव संग्रहालय, डाॅक्टरांची निवासी व्यवस्था आदी विभागाची पाहणी करुन माहिती घेतली. तसेच रुग्णांची हेळसांड होवू नये, म्हणून औषधांचा माहिती जाणून घेतली. वायसीएम भांडार विभागाने सध्यस्थितीत रुग्णांना लागणा-या अत्यावश्यक 25 लाख रुपयांच्या औषधांची खरेदी करण्यात आली आहे. वैद्यकीय महाविद्यालय डाॅक्टरांमुळे यापुढे डाॅक्टरांची कमतरता भासणार नाही. तसेच अन्य परिचारिका, आया व वाॅर्डनच्या अपु-या संख्येबाबत लवकरच त्यावर निर्णय घेण्यात येईल, असेही पवार यावेळी म्हणाले.

वायसीएम स्थिती पुर्वीपेक्षा चांगली…

वायसीएम रुग्णालयात रुग्णांना चांगल्या सोयी-सुविधा देण्यात येत आहे. अनेक रुग्णांवर महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेतून मोफत उपचार करुन रुग्णांना दिलासा दिला आहे. रुग्णालयात सध्या 7 विषय सुरु असून मेडीसीन, सर्जरी आणि रेडिओलाॅस्टिक हे विभाग लवकरच सुरु करणार आहोत. सध्यस्थिती 23 डाॅक्टर उपलब्ध असून तीन वर्षानंतर आपल्याकडे साधारणता 150 डाॅक्टर उपलब्ध असतील. आपले महाविद्यालय चंदिगढपेक्षा अधिक चांगले करण्याचा आपला मानस आहे.

 

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button