breaking-newsताज्या घडामोडीपुणेमुंबई

पुण्यात दगडूशेठ आणि मुंबईत सिध्दीविनायक मंदिराबाहेर भाविकांची गर्दी

मुंबई – चतुर्थी आणि मंगळवार हा योग जुळून आला की अंगारकी चतुर्थी असते. या दिवशी गणेश मंदिरांमध्ये मोठी गर्दी होते. परंतु यंदा कोरोना संकटामुळे मंदिरे बंद आहेत. त्यामुळे आज गणेश चतुर्थीनिमित्त पुण्याच्या दगडूशेठ गणपती मंदिराबाहेर आणि मुंबईच्या सिद्धीविनायक मंदिराबाहेर भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. मंदिर बंद असल्याने लोक रस्त्यावर थांबून बाप्पाचे दर्शन घेत होते. परंतु रस्त्यात मध्येच थांबणाऱ्या लोकांमुळे रस्त्यावरील वाहतुकीस प्रचंड अडथळा होत होता. मंदिराबाहेर भाविकांची गर्दी आणि रस्त्यावर वाहतूक कोंडी असे चित्र निर्माण झाले होते. महत्त्वाचे म्हणजे सिद्धीविनायक मंदिर न्यासातर्फे २४ तास ऑनलाईन दर्शनाची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली असतानाही भाविकांनी मंदिराबाहेर रस्त्यावर उभे राहून गणरायाचे प्रत्यक्ष दर्शन घेणे पसंत केले.

दरम्यान, प्रत्येक महिन्यात संकष्टी चतुर्थी येते तर अंगारकी चतुर्थी वर्षातून दोनवेळा येते. आज, मंगळवार, २७ जुलै रोजी वर्षातील दुसरी अंगारकी चतुर्थी होती. अंगारकी चतुर्थी निमित्त गणेशभक्तांमध्ये मोठा उत्साह असतो. या दिवशी गणेशाची भक्तीभावाने पूजा केली जाते. अनेक गणेशभक्त या निमित्ताने उपवासही करतात.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button