breaking-newsUncategorizedताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

कचरा प्रश्न पेटला; नगरसेवक तुषार कामठेचा भाजपला घरचा आहेर(VIDEO)

  • मुख्यालयासमोर कचरा ओतून आरोग्य अधिका-यांचा निषेध
  • निष्क्रीय आयुक्त, आरोग्य अधिका-यांवर कारवाई करा…

पिंपरी ( महा ई न्यूज ) – पिंपरी-चिंचवड शहरात कचरा प्रश्न चांगलाच पेटला आहे. शहरात कचराकुंड्या ओव्हरफ्लो झाल्या आहेत. गल्लोगल्ली कचरा ढिग साचले आहेत. या परस्थितीस कचरा गोळा करणा-या ठेकेदारांचा निष्काळजीपणा, आरोग्य कार्यकारी अधिका-यांचे दुर्लक्षामुळे कचरा प्रश्न अधिकच गंभीर झाला आहे. गेल्या दहा दिवसापासून कच-यांचा प्रश्न न सुटल्याने नगरसेवक तुषार कामठेंनी मुख्यालयासमोर कचरा ओतून निष्क्रीय आयुक्त श्रावण हर्डिकर, मुख्य आरोग्य कार्यकारी अधिकारी डाॅ. अनिल राॅय, आरोग्य कार्यकारी अधिकारी डाॅ. लक्ष्मण गोफणे यांचा निषेध व्यक्त केला. तसेच सत्ताधारी भाजप पदाधिका-यांना मागील अडीच वर्षात कचरा प्रश्न सोडविता न आल्याने नगरसेवक तुषार कामठेंनी घरचा आहेर दिला आहे. 

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने घरोघराचा कचरा उचलणे, कचरा संकलन करुन मोशीत घेवून जाण्याचे आठ वर्षांचे टेंडर काढले होते. शहराची उत्तर आणि दक्षिण भागात विभागणी करुन देण्यात आली. उत्तर भाग बी.व्ही.जी इंडिया लिमिटेड तर, दक्षिण भाग ए.जी. एन्वायरो इन्फ्रा प्रोजेक्ट्स यांना काम देण्यात आले. 1 जुलैपासून ठेकेदारांनी प्रत्यक्षात कचरा संकलन व वहनाच्या कामास सुरुवात केले.

पिंपरी चिंचवड शहरात दोन्ही ठेकेदारांच्या कामाचा कचराच झाला आहे. आठही प्रभागात कच-यांचा प्रश्न गंभीर बनला आहे. ठेकेदार घरोघरचा कचरा व्यवस्थित संकलित करीत नाहीत. वाहनांची उंची अधिक असल्याने कचरा टाकताना महिलांना अडचणी येत आहेत. तसेच  सोसाट्यांमधील कचरा उचलला जात नाही. कचराकुंडीच्या बाहेर पडलेला कचरा उचलला जात नाही. केवळ कुंडीतीलच कचरा उचलला जात आहे. जागोजागी कच-याचे ढिग साचले असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होवून संसर्गजन्य आजार पसरण्याची शक्‍यता आहे.

कच-यांचा प्रश्न गंभीर होवूनही आयुक्त श्रावण हर्डिकर यांना शहराचं काहीच देणं-घेणं नाही. तर मुख्य आरोग्य कार्यकारी अधिकारी डाॅ. अनिल राॅय, आरोग्य कार्यकारी अधिकारी डाॅ. लक्ष्मण गोफणे या दोघांनीही कचरा प्रश्नांवर स्वताःची जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करीत आहेत. हे आमच्या काळात टेंडर झालेले नाही. पुर्वीच्याच अधिका-यांनी केलेले टेंडर आहे, आम्ही केवळ त्याची अमंलबजावणी केलेली आहे. त्यामुळे आम्ही दोन्ही ठेकेदारांना नोटीस बजावल्या आहेत. हा प्रश्न सोडवण्यासाठी हे अधिकारी समक्ष नाहीत. त्या दोघांवर कारवाई करुन पुन्हा वैद्यकीय विभागात परत पाठवा, तसेच आरोग्य विभागाचा पदभार सक्षम अधिका-यांना देवून ठेकेदारांचे कडक कारवाईची मागणी नगरसेवक तुषार कामठे यांनी केली आहे.  

 

स्थायी सभागृहाबाहेर राष्ट्रवादीने फेकला कचरा…

सत्ताधारी भाजप पदाधिका-यांनी पिंपरी चिंचवड शहर स्वच्छ व सुंदर बनवण्यापेक्षा शहर कच-यात नेऊन टाकले आहे. शहराचा कचरा प्रश्न गंभीर होवूनही ठेकेदारांच्या कामकाजात कोणतीच सुधारणा झालेली नाही. त्यामुळे आरोग्य विभागाचा कारभार करणारे निष्क्रीय अधिका-यांवर कडक कारवाई करा, संबंधित ठेकेदारांवर दंडात्मक कारवाई करुन काळ्या यादीत टाका, अशी मागणी राष्ट्रवादीचे नगरसेवक मयूर कलाटे, पंकज भालेकर यांनी केली आहे. तसेच स्थायी समिती सभागृहाबाहेर कचरा फेकून महापालिका प्रशासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे. 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button