breaking-newsTOP Newsपिंपरी / चिंचवड

‘वायसीएम’ रुग्णालयात धिंगाणा घालणा-या नगरसेवकावर गुन्हा दाखल करणार, बैठकीत निर्णय

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयामध्ये एका नगरसेवकाने डॉक्टर कर्मचाऱ्यांना रुग्णसेवेवरुन शिवीगाळ केल्याचा प्रकार घडला. या पार्श्वभूमीवर रुग्णालयातील सर्व निवासी डॉक्टरांनी काम बंद करण्याचा पवित्रा घेवुन रुग्णालयाबाहेर आंदोलन केले. त्यावर पालिकेतील सत्ताधारी भाजपचे पदाधिकारी, प्रशासनाचे अधिकारी यांनी वायसीएममधील डॉक्टरांची तातडीने बैठक घेतली. डॉक्टरांच्या मागणीनुसार संबंधित नगरसेवकावर गुन्हा दाखल करण्यात येईल, असे आश्वासन दिल्यानंतर डॉक्टरांनी आंदोलन मागे घेतले.

बैठकीत आमदार तथा शहराध्यक्ष महेश लांडगे, आमदार लक्ष्मण जगताप, महापौर उषा उर्फ माई ढोरे, आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, अजित पवार, उपमहापौर तुषार हिंगे, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समिती अध्यक्ष संतोष लोंढे माजी सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार उपस्थित होते.

या बैठकीमध्ये निवासी डॉक्टरांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने रुग्णालयाच्या गेटवर पोलीस तैनात करण्यात
येणार असल्याचे तसेच डॉक्टरांच्या रात्रीचे वेळी अचानक उद्भवनाऱ्या समस्यांचे तातडीने निराकरण करण्यासाठी एका जबाबदार वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात येणार आहे. उपस्थित डॉक्टरांनी मानधन वाढी बाबत मुद्दा उपस्थित केला होता. त्यानुषंगाने वरिष्ठ निवासी डॉक्टरांचे मानधन ६५ हजारावरुन ७५ हजार व कनिष्ठ निवासी डॉक्टरांचे मानधन ५५ हजारावरुन ६५ हजार इतकी वाढ केली असल्याचे स्पष्ट केले. तसेच नगरसेवक व पदाधिकारी यांचे रुग्णासंदर्भातील समस्याचे निराकरण करणेसाठी वायसीएम रुग्णालयामध्ये स्वतंत्र कक्ष निर्माण करणेत येणार आहे.

त्याचबरोबर वायसीएम रुग्णालयामध्ये दाखल असणाऱ्या रुग्णांची माहिती दर्शविणारा फलक रुग्णालयाच्या दर्शनी भागात लावण्याच्या सुचना देण्यात आल्या. सद्या सर्वच रुग्णांलयावर कामाचा ताण असताना देखिल रुग्णालयातील नर्सेसच्या सर्वेक्षणासाठी नेमणूका केलेल्या आहेत. त्यांच्या ऐवजी आशा वर्करला प्रशिक्षित करुन या सर्वेक्षणाच्या कामासाठी त्यांची नेमणूक करण्यात येणार आहे व उपलब्ध होणाऱ्या नर्सेसच्या नेमणूका रुग्णालयामधील अतिदक्षता विभागामध्ये करण्यात येणार आहेत. कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहाता बालनगरी व ऑटो क्लस्टर येथे जम्बो रुग्णालय तयार करण्यात येत असुन त्यामध्ये मोठ्या प्रमाणात ऑक्सिन व आयसीयु बेडची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याबाबतचे निर्णय या बैठकीत घेण्यात आले.

एखाद्या रुग्णांस कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्यास त्याचे कुटुंबिय किंवा सख्खे नातेवाईकसुध्दा रुग्णाजवळ येत नाहीत. तथापि, वायसीएम रुग्णालयातील डॉक्टर आपल्या जिवाची व कुटुंबाची पर्वा न करता रात्रंदिवस रुग्णालयात उपस्थित राहुन रुग्णसेवा करीत आहेत. त्यासाठी त्यांना प्रोत्साहित करुन त्यांचे मनोबल वाढवणे गरजेचे आहे. असे असताना काल घडलेला प्रकार निंदणीय असुन याबाबत दोन्ही आमदारांनी डॉक्टरांना त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने वेळीच दखल घेतली जाईल असे आश्वासित केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button