breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडीमनोरंजन

अभिनेत्री प्रियंका-निकच्या कुटुंबात चिमुकलीचं आगमन

मुंबई : प्रियंका चोप्रा आणि निक जोनस यांच्या घरात एक आनंदाची बातमी आहे. प्रियंकाच्या दिराची पत्नी म्हणजे जो जोनसची पत्नी सोफी टर्नरने गोंडस मुलीला जन्म दिला आहे. पीपलने दिलेल्या माहितीनुसार गेम ऑफ थ्रोनची अभिनेत्री सोफी टर्नर आणि जो जोनसने आपल्या गोंडस मुलीचं नाव विला (Willa) असं ठेवलं आहे. सोफीने २२ जुलै रोजी लॉस एंजिलिसच्या एका हॉस्पिटलमध्ये मुलीला जन्म दिला आहे.

लहान मुलीच्या आगमनामुळे हे दाम्पत्य आणि कुटुंब अतिशय आनंदात आहे. सोफी टर्नरचे अनेक फोटो गरोदरपणात सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. ज्या फोटोंत ती बेबी बम्प फ्लॉन्ट करताना दिसत आहे. 

https://www.instagram.com/p/BzetyV7BVll/?utm_source=ig_embed&ig_mid=40166074-DC49-4339-BCD0-075B9AB58087

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button