breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘वायसीएम’ रुग्णालयात डाॅक्टरांच्या अक्षम्य चुका; किडन्या व्यवस्थित असूनही रुग्णांवर डायलिसिस प्रक्रिया

  • वेताळनगरच्या आनंद सांधेदुखी व तापामुळे त्रस्त
  • खासगी रुग्णालयातील रक्त तपासणीनंतर रिपोर्ट नाॅर्मल

पिंपरी ( महा ई न्यूज ) – महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील डॉक्टरांनी चुकीचे उपचार केल्याचा गंभीर प्रकार रुग्णांच्या नातेवाईकांनी केला आहे. एका तरुणाच्या दोन्ही किडन्या व्यवस्थित असतानादेखील डॉक्टरांनी त्यावर डायलिसिसची प्रक्रिया केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.

पिंपरी चिंचवड शहरातील वेताळनगरमध्ये राहणारा आनंद अनिवाल हा तरुण सांधेदुखी आणि तापामुळे त्रस्त होता. त्याला उपचारासाठी YCM रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर आनंदच्या रक्ताच्या तपासण्या केल्या गेल्या. ज्यामध्ये त्याच्या रक्तातील क्रिटेनिनच प्रमाण 24 असल्याचा रिपोर्ट आला. सामान्य माणसाच्या शरीरात हे प्रमाण फक्त 0.66 ते 1.25 एव्हढंच असतं. मात्र, आनंदच्या रिपोर्टमध्ये हे प्रमाण 24 पट अधिक दाखवल्याने डॉक्टरना धक्का बसला.

या रिपोर्टनुसार रुग्णाच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्याचं समजून डॉक्टरांनी आनंदवर डायलिसिस करण्याचा निर्णय घेऊन ती प्रक्रिया पूर्ण केली. त्यानंतर आनंदाचा रक्त तपासणीचा दुसरा रिपोर्ट आला. ज्यामध्ये त्याच्या किडन्या आणि क्रिटनिनचं प्रमाण नॉर्मल दाखवलं गेलं. हा सगळा प्रकार पाहिल्यानंतर आनंदच्या नातेवाईकांना मोठा धक्काच बसला. त्यानंतर त्यांनी परत रक्त तपासणी करण्याचं ठरवलं.

आनंदच्या रक्ताचे नमुने खासगी रुग्णालयात पाठवण्यात आले. तेव्हा तिथूनही आनंदाचा रिपोर्ट नॉर्मल आला. त्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला. आता याबाबत  YCM रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर राजेंद्र वाबळे यांना विचारलं असता त्यांनी प्रकणाची सखोल चोकशी करण्यात येईल, असं सांगितलं.

परंतू, रुग्णालयाच्या आणि संबंधित डॉक्टरांच्या अशा हलगर्जीपणामुळे या एखाद्याचा जीव जाण्याची शक्यता आहे. या घटनेमुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button