breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘वायसीएम’ : दोषी डॉक्टरवर फौजदारी दाखल करा, स्थायीत आगपाखड

  • स्थायी समिती सभेत सदस्यांनी केली मागणी
  • गुन्हा दाखल करण्याचे आयुक्तांनी दिले आश्वासन

पिंपरी, (महाईन्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रूग्णालयात आता पी. जी. इन्स्टिट्यूट आणि नियमित डॉक्टर यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला आहे. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे एका रूग्णाचे अनावश्यक डायलिसिस करण्यात आले. ही घटना अत्यंत गंभीर असून याप्रकरणी तज्ज्ञ डॉक्टरांची समिती नेमली असेल तर संबधिंत दोषी अधिका-यांवर गुन्हा दाखल करा, अशी मागणी स्थायीच्या सदस्यांनी केली आहे. त्यावर आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दोषी डॉक्टरवर कडक कारवाई करू, असे आश्वासन दिले आहे.

मागील आठवड्यात चिंचवडगावातील आनंद अनिवाल हा तरूण सांधेदुखी आणि तापाच्या आजारामुळे वायसीएम रूग्णालयात दाखल झाला होता. त्याच्या रक्ताच्या पहिल्या अहवालात क्रिटेनीनचे प्रमाण 24 असल्याचे दाखविले. त्यामुळे डॉक्टरांनी पुन्हा तपासणी कऱण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या रक्त तपासणीचा अहवाल न पाहताच त्याचे डायलिसिस केले. मात्र, या प्रकऱणात कुठलीही चुक न झाल्याचा दावा वायसीएमचे अधिष्ठाता डॉ.वाबळे यांनी स्थायीच्या बैठकीत केला आहे. याप्रकरणी ससून रूग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांची समिती स्थापन केली आहे. मात्र, या समितीमध्ये वायसीएमचा एखादा वैद्यकीय अधिकारी नियुक्त करा, अशी मागणी स्थायी सदस्यांनी केली.

वायसीएम रूग्णालयात सातत्याने डॉक्टरांचा पदावरून वाद सुरु असतो. अता पी. जी. इन्स्टिट्यूट आणि रेग्युलर डॉक्टर यांचा वाद सुरु आहे. डॉक्टरांचा अंतर्गत वाद सर्वसामान्यांच्या जीवावर बेतु शकतो. आतापर्यंत डॉक्टरांच्या हलगर्जीपणाचे अनेक प्रकरणे वायसीएममध्ये घडले आहेत. सर्वसामान्यांना खासगी रूग्णालयातील दर परवडत नसल्याने वायसीएममध्ये सेवा घेतात. त्यांच्या बाबतीत हलगर्जीपणा खपवुन घेतला जाणार नसल्याचे सांगून सदस्यांनी प्रशासनाला खडसावले. याप्रकऱणातील दोषी डॉक्टरवर गुन्हा दाखल करा, अशी मागणी सदस्यांनी केली.

  • चौकशी समितीच्या अहवालामध्ये संबधिंत डॉक्टर दोषी आढळल्यास त्यावर कडक कारवाई केली जाईल.
  • श्रावण हार्डीकर, आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका 
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button