breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

Kia च्या ‘या’ मॉडेलमध्ये आढळला दोष; कंपनीने गाड्या परत मागवल्या!

मुंबई : नुकतीच दिवाळी पार पडली. यंदा कोरोनाचा प्रभाव असल्याने हा सण साधेपणानं साजरा करण्याचं आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आलं होतं. कोरोनामुळे आर्थिक चक्र बिघडलं असल्याने टाळेबंदी काळात ऑटोमोबाईल क्षेत्रास मोठा फटका सहन करावा लागला. मात्र, अनलॉक सुरु होताच दसरा-दिवाळीचा मुहूर्त साधत अनेकांनी आपल्या पसंतीची चारचाकी खरेदी करण्यासाठी गर्दी केल्याचं दिसून आलं.

कित्येक गाडयांना तर महिन्यापेक्षा अधिक वेटिंग असल्याचं देखील बघण्यास मिळालं. आता, गेल्या २ वर्षात भारतात मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळवणाऱ्या Kia या मोटार कंपनीच्या ग्राहकांसाठी महत्वाची बातमी समोर येत आहे. कोरियन कंपनी Kia Motors ने 2019 मध्ये भारतात Kia Seltos ही कार लाँच केली होती.

आता या कारच्या डिझेल व्हेरिएंटमधील सर्व गाड्या परत मागवल्या आहेत. या कारच्या फ्यूल पंपांमध्ये काहीतरी बिघाड झाला आहे, असं कंपनीच्या लक्षात आलं आहे, त्यामुळेच कंपनीने रिकॉलचा निर्णय घेतला आहे. कंपनीने म्हटलं आहे की, 1 ऑक्टोबर 2019 ते 13 मार्च 2020 या दरम्यान बनवलेल्या सेल्टॉस कारच्या सर्व डिझेल व्हेरिएंटच्या इंधन पंपांमध्ये दोष आढळला आहे. त्यामुळे आम्ही डिझेल व्हेरिएंटच्या सर्व कार परत मागवल्या आहेत. इंधन पंपातील या त्रुटीमुळे कारचं मोठं नुकसान होऊ शकतं, त्यामुळेच आम्ही रिकॉलचा निर्णय घेतला आहे.

कंपनी दोष असलेला पार्ट मोफत बदलून देणार ?

कंपनीने स्पष्ट केलं आहे की, र परत मागवल्यानंतर आम्ही कारच्या इंधन पंपाची तपासणी करु, त्यामध्ये कोणताही दोष आढळल्यास आम्ही मोफत दुरुस्त करुन देऊ, आणि जर पंपामध्ये कोणताही दोष आढळला नाही तर तो पंप न बदलता पूर्ण तपासणी करु कार परत करु.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button