breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

वायसीएमच्या कारभारात डॉ. पद्माकर पंडित यांची लुडबूड नको

स्थायी समितीच्या सदस्यांची मागणी

पिंपरी ( महा ई न्यूज ) –  यशवंतराव चव्हाण रुग्णालयातील वैद्यकीय महाविद्याच्या अधिष्ठाता पदावर डॉ पद्माकर पंडीत यांची नियुक्ती होताच ते वादाच्या भोव-यात अडकले आहेत.  विरोधी नगरसेवकांनी डाॅ. पंडीत यांना वैद्यकीय महाविद्यालयाचे काम द्या, पण त्यांची वायसीएमच्या कारभारात लुडबूड नको, अशी मागणी स्थायी समितीच्या बैठकीत केली. मात्र, कायमस्वरूपी अधिष्ठाता येईपर्यंत आणि महाविद्यालयाचे काम होईपर्यंत डॉ. पंडित यांच्याकडेच वायसीएम रूग्णालयाचे कामकाज राहणार असल्याची माहिती आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी देवून त्यांची पाठराखण केली.  तसेच महापौर, नगरसेवकांना विचारात घेऊन काम न केल्यास वेगळा मार्ग काढू, असे आश्वासन आयुक्तांनी दिले.

महापालिकेच्या स्थायी समितीची शुक्रवारी (दि.21) रोजी ममता गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीमध्ये डॉ. पद्माकर पंडित यांची स्थायी सभागृहाला ओळख करून देण्यात आली. त्यांच्याकडे कुठल्या जबाबदाऱ्या असणार याची माहिती देण्यात आली. वादग्रस्त डॉ. पद्माकर पंडीत यांच्यावर स्थायीचे सदस्य राजू मिसाळ यांच्याकडून प्रश्नांचा भडीमार करण्यात आला. तसेच एका रूग्णांवर उपचारांसाठी महापौरांनी फोन केला असता, त्यांच्याकडून शिफारस पत्र मागविल्यामुळे सदस्यांनी संताप व्यक्त केला. संतापलेले सदस्य पाहूण डॉ. पंडित यांनी सदस्यांची माफी मागितली. मात्र सदस्यांची नको, तर महापौरांची माफी मागा असे खडेबोल राजू मिसाळ यांनी सूनावले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभाग व रुग्णसेवेचा डॉ. रॉय व डॉ. साळवे यांच्यातील वादामुळे खेळखंडोबा झाला आहे. त्यांच्यातील वादामुळे दोघांमध्ये कारभाराची विभागणी करण्यात आली होती. काही महिन्यांपूर्वीच आयुक्त हर्डीकर यांनी डॉ. रॉय यांच्याकडून वायसीएमच्या विभागप्रमुखाचा पदभार काढून तो डॉ. साळवे यांच्याकडे दिला होता. आयुक्तांनी पुन्हा हा पदभार पदव्युत्तर महाविद्यालयासाठी नेमलेले प्राध्यापक तथा विशेष कार्य अधिकारी डॉ. पंडीत यांच्याकडे सोपविला आहे. मात्र, आयुक्तांनी परस्पर घेतलेल्या या निर्णयावरून नाराजी व्यक्त होत आहे.

डॉ. पंडीत हे शासन सेवेत होते. परंतु, त्यांची वैद्यकीय पदव्युत्तर महाविद्यालयासाठी मानधनावर ठराविक कालावधीसाठी नेमणूक केली होती. तरी देखील महापालिकेच्या अधिका-यांना बाजुला सारून डॉ. पंडीत यांना विभागप्रमुख म्हणून घोषित करण्यात आले. हे योग्य नसल्याचा मुद्दा सदस्यांनी उपस्थित केला. त्यावर आयुक्त हर्डीकर वैद्यकीय महाविद्यालायाचा अधिष्ठाता म्हणून डॉ. पंडीत यांना नेमले जाणार असल्याने त्यांच्याकडेच वायसीएमचा कारभार देत असल्याचा खुलासा केला.दरम्यान, आयुक्तांच्या या खुलाशावर नगरसेवकांचे समाधान झालेले नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button