breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी

‘पाणीपुरी’वाल्या पोराची ‘रॉयल’ भरारी; यशस्वीला २.४ कोटींची ‘लॉटरी’

मुंबई | महाईन्यूज

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल 2020) पुढील मोसमासाठी कोलकाता येथे आज खेळाडूंचा लिलाव होणार आहे. 73 जागांसाठी 338 खेळाडू रिंगणार आहेत. या यादित 190 भारतीय, 145 परदेशी आणि 3 संलग्न देशांतील खेळाडूंचा समावेश आहे. पहिल्याच प्रयत्नात मुंबई इंडियन्सनं ख्रिस लीनला दोन कोटी मूळ किमतीत आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या अॅरोन फिंचनं मोठी बोली लागली. विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघानं त्याला आपल्या ताफ्यात घेतले. पण, ऑसींच्याच ग्लेन मॅक्सवेलसाठी किंग्स इलेव्हन पंजाबनं 10.75 कोटी मोजली आहे. मात्र, पॅट कमिन्सनं याही पुढे जात रेकॉर्ड तोड कमाई केलेली आहे.

पण, युवा खेळाडूंमध्ये सर्वांचे लक्ष वेधलेल्या मुळचा उत्तर प्रदेशचा, परंतु मुंबई कर्मभूमी असलेल्या यशस्वी जैस्वालना आयपीएलचे पहिले काँट्रॅक्ट मिळाले आहे. याच युवा खेळाडूंत यशस्वीनं सर्वाधिक भाव खाल्ला आहे. यशस्वीच्या या यशामागे त्याची कठोर मेहनत, जिद्द आणि प्रबळ इच्छाशक्ती आहे. त्याच्या यशाला मिळत असलेल्या लखलखाटामागे मनाला हेलावून टाकणारी दुसरी बाजू आहे. तीन वर्ष यशस्वी तंबूत राहिला, पाणीपुरी विकली… क्रिकेटपटू बनण्यासाठी त्यानं जे हाल सोसले, ते डोळ्यात पाणी आणणारे आहेत. पण, त्याचा प्रवास हा अनेकांना प्रेरणा देणारा आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button