breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

‘सोनियांचा पोपट काय म्हणतो, 25 हजाराला नाही म्हणतो’; भाजपा आमदारांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

मुंबई | महाईन्यूज

नागपुरात सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात तिसऱ्या दिवशीही विरोधक शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून आक्रमक होताना पाहायला मिळाले. 25  हजार रुपये हेक्टरी भाव दिलाच पाहिजे या मागणीसाठी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी हातात सामनाचे फलक घेऊन भाजपच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर निदर्शने केली आहेत. ‘सोनियांचा पोपट काय म्हणतो, 25 हजाराला नाही म्हणतो’ अशा घोषणा देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर भाजप आमदारांनी टीका केलेली आहे.

विधानसभेत मंगळवारी भाजप आमदारांनी शेतकऱ्यांना 25 हजारांची मदत देण्यात यावी या मागणीसाठी आक्रमक भूमिका घेतलेली होती. तर ‘सामना’तील बातमीचं पोस्टर सुद्धा भाजपच्या आमदारांकडून विधानसभेत झळकवण्यात आले होते. त्यानंतर शिवसेनेचे आमदारही आक्रमक झाले व त्यातून धक्काबुक्कीचा प्रकार घडल्याचे सुद्धा समोर आले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button