breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

राजकीय चिखलफेक : बारणे- जगताप यांच्या वादात दत्ता साने यांची उडी

  • आमदार जगताप यांच्यावर साधला निषाणा
  • आम्ही समर्थ, असा दिला उपरोधीत सल्ला

पिंपरी- शहरातील विकास कामांच्या मुद्यांवरून शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे आणि भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांच्यात प्रतिष्ठेचा संघर्ष सुरू आहे. दोघांच्या वादातून शहराच्या राजकारणात सुडाची आग धुमसत आहे. यामध्ये कार्यकर्ते होरपळून निघत असताना पालिकेतील राष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी या आगीत उडी घेतली आहे. त्यांनी थेट आमदार जगताप यांच्यावर निषाणा साधला आहे. जर, भाजपचे आमदार पालिकेत अधिका-यांच्या बैठका घेऊ शकतात, तर शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे का विकास कामांवर बैठका घेऊ शकत नाहीत. आमदारांनी पालिकेत येण्याची गरज नाही. त्यांनी विधानसभेत शहराचे प्रश्न मांडावेत. शहराच्या प्रश्नासाठी एक विश्वस्त म्हणून आम्ही समर्थ आहोत, अशी तोफ साने यांनी आज मंगळवारी (दि. 28) डागली आहे.

 

केंद्र सरकाच्या योजनेंतर्गत महापालिकेच्या माध्यामातून पिंपरी चिंचवड शहरातील अल्प उत्पन्न गटातील नागरीकांसाठी पंतप्रधान आवास योजना राबविण्यात येत आहे. मात्र, या प्रकल्पातील पार्किंगच्या शूल्कासह सदनिकेचा दर 2 हजार 700 चौरस फुट आहे. २०१० मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार कोणत्याही विकसकाला वाहनतळाची सुविधा सदनिकाधारकास निशुल्क देण्याचे निर्देश आहेत. तरीही, या योजनेत पार्किंगचे दर आकारले जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या प्रकल्पाच्या तीनही निविदा रद्द कराव्यात, अशी सूचना विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी केली आहे.

 

महापौर यांच्या पत्रकार परीषदेमध्ये पंतप्रधान आवास योजनेच्या गृहप्रकल्पाच्या सल्लागारांनी डीपीआर तयार करुन दिल्याची माहिती सांगण्यात आली. त्यानुसार बांधकामांचा प्रतिचौरस फुटाचा दर हा १ हजार ६०० ते १ हजार ६५० इतका आहे. पार्किंगचे शुल्क धरुन तो एकत्रित दर २ हजार ७०० चौरस फूट आहे. असे विधान कालच केले आहे. व यामध्ये खासदारांनी पालिकेत लक्ष घालू नये, असे विधानही केले आहे. वस्तुत: २०१० मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार कोणत्याही विकसकाला वाहनतळाची सुविधा सदनिकाधारकास विनाशुल्क देण्याचा निकाल दिलेला आहे. त्यामुळे प्रस्तुतच्या डीपीआर मधील पार्कींगचे शुल्क घेणे हे बेकायदेशीर आहे. सदरची निविदा प्रक्रीया रद्द करण्यात यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते साने यांनी केली आहे.

 

विधानसभेत आमदारांच्या तोंडून ब्र निघत नाही

शिवसेनाच्या खासदारांनी पालिकेत लक्ष घालू नये, असेही वक्तव्य भाजपच्या नेत्यांनी केले होते. मात्र, भाजपाचे आमदार महापालिकेत मिटींग घेतात. पत्रे देतात ते खुलेआमपणे शहरातील विकासकामांबाबत अधिका-यांच्या बैठकी घेतात. शहरातील पाणी प्रश्नाबाबत पालिकेत येऊन पत्रकार परीषद घेतात ते भाजपला चालते. भाजपचे आमदार विधान सभेत शहरातील समस्यांबाबत साधा ब्र शब्दही काढत नाहीत. त्यांनी विधानसभेतील शहराचे प्रश्न मांडावेत. शहराच्या प्रश्नासाठी एक विश्वस्त म्हणून आम्ही समर्थ आहोत, असा उपरोधीत सल्लाही साने यांनी जगताप यांना दिला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button