breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

वाकडमध्ये शाळा व्यवस्थापनाकडून विद्यार्थ्यांचा मानसिक छळ

– शाळेवर फाैजदारी दाखल करा, आम आदमी पक्षाची मागणी 

पिंपरी ( महा ई न्यूज ) – वाकड येथील एका खासगी शाळेने अवाढव्य शैक्षणिक शुल्क वाढवून पालकांसह विद्यार्थ्यांचा मानसिक छळ सुरु केला आहे. या शाळेवर शिक्षण विभागाने कार्यवाही न करता केवळ नोटीस दिली आहे. त्यामुळे शाळेच्या व्यवस्थापनावर फाैजदारी दाखल करावी, अशी मागणी आम आदमी पार्टीच्या पदाधिका-यांच्या नेतृत्वाखाली पालकांनी पिंपरी महापालिकेतील शिक्षण विभागासमोर ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. 

महापालिका मुख्यालयातील दुस-या मजल्यावरील शिक्षण विभागासमोर पालकांनी आज (मंगळवारी)सकाळी अकरा वाजल्यापासून ठिय्या मांडला आहे. महापालिका जोपर्यंत ‘शाळेवर फौजदारी कारवाई करत नाही, तोपर्यंत आम्ही हलणार’ नसल्याची भुमिका पालकांनी घेतली. या आंदोलनात आम आदमी पार्टीचे राज चाकणे, प्रवक्ते मुकुंद किरदत, पुणे जिल्हा संघटक राजेश चौधरी, युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष चेतन बेंद्रे, अय्याज सय्यद, महेश बडगिरे, अॅड. उमेश साठे, चिंचवड विधानसभा अध्यक्ष बसवराज कणजे आणि पालक पुनित शर्मा, राकेश मठिया सहभागी झाले आहेत.

आम आदमीचे पुणे जिल्हा संघटक राजेश चौधरी म्हणाले, “वाकड येथील एक खासगी शाळा आणि पालकांमध्ये गेल्या तीन वर्षांपासून शैक्षणिक शुल्कावरुन वाद सुरु आहे. त्याविरोधात पालक आवाज उठवित आहेत. कायदेशीर कारवाई करु शकत नसल्याने शाळेकडून काही विद्यार्थ्यांना सापत्नपणची वागणूक दिली जात आहे. विद्यार्थ्यांचा मानसिक छळ केला जात आहे. विद्यार्थ्यांचा निकाल (रिझल्ट) राखून ठेवला जात आहे. विद्यार्थ्यांना केवळ एक ते दीड तासच वर्गात बसू दिले जात आहे. पिंपरी महापालिकेच्या शिक्षण विभागाने या शाळेवर कारवाई करणे अपेक्षित असताना प्रशासन कारवाईस टाळाटाळ करत आहे”.

‘महापालिकेने केवळ शाळेला नोटीस दिली आहे. परंतु, पुढे त्यावर कोणतीही कार्यवाही केली नाही. केवळ चौकशी सुरु असल्याचे सांगितले जाते. चौकशी करण्यास एवढा कालावधी कशासाठी लागत आहे ? प्रशासनाने तातडीने शाळेवर फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी चौधरी यांनी केली. शिक्षण विभाग जोपर्यंत या मनमानी करणा-या शाळेवर फौजदारी कारवाई करत नाही. तोपर्यंत आम्ही उठणार नसल्याचा’ इशाराही त्यांनी दिला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button