breaking-newsताज्या घडामोडीपुणे

शुक्रवारी राज्यभरातील 20 हजार शाळा बंद

पुणे – खासगी शिक्षण संस्थांमध्ये शिक्षकांच्या रिक्त जागा भरताना येणाऱ्या असंख्य अडचणी, शिक्षण संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना देण्यात येणारी दुय्यम दर्जाची वागणूक, शिपाई भरतीवर असणारी बंदी, अशा विविध प्रश्‍नांवर सरकारने लवकरात लवकर तोडगा काढावा, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य शिक्षणसंस्था महामंडळातर्फे येत्या शुक्रवारी (ता.२) शाळा बंद आंदोलन करण्यात येणार आहे. राज्यातील जवळपास दहा हजार खासगी शिक्षण संस्था या आंदोलनात सहभागी होणार असून जवळपास २० हजारांहून अधिक शाळा बंद राहणार आहेत.

महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यासाठी वारंवार विनंती करूनही मुख्यमंत्री प्रतिसाद देत नाही. बालकांच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्याचा शिक्षण विभागातर्फे सोयीनुसार अर्थ लावला जात असल्यामुळे अनेक अडचणी निर्माण होत आहेत. शिक्षकेतर अनुदानही तुटपुंजे असून ते सर्व शाळांना मिळत नाही, असे प्रश्‍न महामंडळातर्फे मांडण्यात आले आहेत.

सर्व प्रश्‍नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी महामंडळाने राज्यातील सर्व शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने मागण्या मान्य न केल्यास दिवाळीनंतर बेमुदत शाळा बंद आंदोलन पुकारण्यात येईल. 
– विजय पाटील, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य शिक्षणसंस्था महामंडळ

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button