breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

‘वर्षा’ बंगल्याच्या भिंतीवरील लिखाणाने पेटले राजकारण

मुंबई महाईन्यूज

‘भिंतीलाही कान असतात…’ अशी एक म्हण आहे. त्यामुळं एखाद्या महत्त्वाच्या विषयावर चार भिंतीच्या आत बोलतानाही काळजी घेतली जाते. मात्र, महाराष्ट्रातील द्वेषाचं राजकारण इतकं टोकाला गेलं आहे की त्यासाठी आता थेट भिंतींचाच आधार घेतला जाऊ लागला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत वर्षा बंगल्याच्या भिंतीवर करण्यात आलेल्या आक्षेपार्ह लिखाणावरून हेच दिसून आलंय.

राज्यातील सत्ता बदलानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी कुटुंबीयांसह वर्षा बंगला सोडला. नवे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अद्याप तिथं राहायला गेलेले नाहीत. मात्र, त्याआधीच वर्षा बंगल्यातील रंगलेल्या भिंतींचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यावरून राजकारणही रंगलं आहे. या भिंतींवर देवेंद्र फडणवीस रॉक्स… यूटी इन मीन (यूटी वाईट आहेत), भाजप, भाजप असंही लिहिण्यात आलं आहे. ‘यूटी’ म्हणजे नेमकं कोण?; यावरून आता तर्कवितर्क लावले जात आहे. उद्धव ठाकरे यांच्या नावाचं इंग्रजीतील संक्षिप्त रूप ‘यूटी’ असं होतं. त्यामुळं हे त्यांनाच उद्देशून असल्याची चर्चा आहे. मात्र, ते नेमकं कोणी लिहिलं? हे व्हिडिओ चित्रण कुणी केलं आणि ते कसं व्हायरल झालं, याबाबत काहीही कळू शकलेलं नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button