breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवडमध्ये दोन नवीन कोरोना रुग्णांची नोंद, आजअखेर ३१ जण Positive

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांच्या संख्येत नवीन २ ने वाढ होऊन शहरामध्ये आजपर्यंत एकुण ३१ रुग्ण पॉझिटीव्ह आढळून आलेले आहेत. या पैकी १२ रुग्ण पुर्णपणे बरे होऊन घरी गेले आहेत. उर्वरित १५ रुग्ण महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात दाखल असून रुग्णांची प्रकृती स्थिर आहे व १ रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यु झालेला आहे. तसेच एकुण ३१ रुग्णांपैकी ३ रुग्ण हे पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील असुन ते सद्यस्थितीला पुणे येथील रुग्णालयात दाखल आहे. त्यांचेवर उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून कळवण्यात आली आहे.

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाच्या नियंत्रणास्तव पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात आपत्कालीन उपाययोजना लागू करण्याची व त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना आखण्याची आवश्यकता निर्माण झाल्याने याकामी विनियर्ड चर्च परिसर, दापोडी (माता शितळादेवी चौक – विनियर्ड चर्च – सुखवानी ग्लोरी – पब्लिक फुड शेल्टर – धुम स्टार मेन्स पार्लर – पिंपळे गुरव रोड – माता शितळादेवी चौक) व डायमंड प्लास्टिक कंपनीजवळ कासारवाडी (सिध्दार्थ मोटार कासारवाडी – दत्तमंदीर – पिंपळे भारत गॅस – सीएमई बॉन्ड्री – सीएमई बॉन्ड्री – सीएमई बॉन्ड्री – सीएमई बॉन्ड्री – सिध्दार्थ मोटार कासारवाडी) हा भाग शनिवार , दि . ११ एप्रिल , २०२० रोजी रात्री ११ . ०० वाजलेपासून पुढील आदेशापर्यंत सील करणेचे आदेश निर्गमित करण्यात आलेले आहेत. तसेच सदर परिसरातील संबंधित पोलिस स्टेशन प्रमुख यांचे मार्फत सदर भागाच्या हद्दी सील करणे आवश्यक आहे. तसेच सदर परिसरांच्या हद्दींमध्ये पुढील आदेशापर्यंत प्रवेशबंदी व परिसरातून बाहेर पडण्यास नागरिकांना बंदी केलेली आहे. सील केलेल्या परिसरातील प्रत्येक नागरिकाने तोंडाला मास्क लावणे बंधनकारक आहे.

तसेच, पिंपरी चिंचवड शहरातील कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावामुळे घरात विलगीकरणात असणाऱ्या नागरिकांची आजपर्यंतची संख्या २०४८ असून त्या सर्वांनी किमान १४ दिवसासाठी व आवश्यकता भासल्यास पुढील २८ दिवसांपर्यत घरातच थांबण्याच्या सूचनांचे पालन करावे. तसेच सुचनांचे पालन न करणाऱ्या होम क्वारंटाईनमधील नागरिकांवर कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार असून सूचनांचे उल्लंघन करणा-या नागरिकांना पोलिसांमार्फत ताब्यात घेवून पुढील १४ दिवसांपर्यत संस्थात्मक अलगीकरण (क्वारंटाईनची) व्यवस्था केलेल्या ठिकाणी राहावे लागेल.

या आदेशाचे उल्लघन करणा-यांना कायद्यानुसार सहा महिन्यांपर्यंत शिक्षेची तरतुद असून नागरिकांनी सर्व सुचनांचे पालन करावे असे आवाहन महापौर उषा उर्फ माई ढोरे व पक्ष नेते नामदेव ढाके यांनी केले आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय व नविन भोसरी रुग्णालयामधून आज दि . १२ / ०४ / २०२० पर्यंत एकुण ८२२ व्यक्तींचे कोरोना (कोबीड १९) करीता घश्यातील द्रव्यांचे नमुने एनआयव्ही, पुणे येथे तपासणी करीता पाठविण्यात आले आहेत. पैकी आज अखेर ७३० व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत . तसेच आज दि . १२ / ०४ / २०२० रोजी एकुण ६५ व्यक्तींना यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेले असून त्यांचे कोरोना (कोवीड १९) करीता घश्यातील द्रव्याचे नमुने एनआयव्ही, पुणे येथे तपासणी करीता पाठविण्यात आले आहेत. कोरोना संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पिंपरी चिंचवड मनपामार्फत नियुक्त करण्यात आलेल्या १६० कर्मचारी यांची क्षेत्रीय सर्वेक्षण टिम घरोघरी जाऊन सर्वेक्षण करीत आहेत. आज दि. १२ / ०४ / २०२० अखेर शहरातील कन्टेनमेंट झोन मधील ३३३९६ नागरिकांचे दैनंदिन सर्वेक्षण करण्यात आलेले असून पिंपरी चिंचवड मनपामध्ये आजपर्यंत २०४८ व्यक्तींना घरातील अलगीकरण कक्षात ठेवण्यात आलेले आहे . घरातील अलगीकरणात असणा – या नागरिकांनी बाहेर पडू नये . अशी व्यक्ती बाहेर पडल्याचे आढळल्यास त्याची माहिती महानगरपालिकेच्या सारथी हेल्पलाईन ८८८८००६६६६ यावर कळवावी असे आवाहन महापौर उषा उर्फ माई ढोरे व पक्ष नेते नामदेव ढाके यांनी केले आहे .

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button