ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महिन्याला 15,000, किलो मागे एक रुपया ; स्क्रॅप व्यावसायिकाला खंडणीसाठी जीवे मारण्याची धमकी

पुणे | स्क्रॅप व्यावसायिकाला जीवे मारण्याची धमकी देऊन, खंडणीपोटी महिन्याला 15,000 व एक किलो स्क्रॅप मागे एक रुपया खंडणी वसूल करुन एकूण 13 लाख 35 हजार घेतले. आरोपींनी वाढीव खंडणीची मागणी केल्याने स्क्रॅप व्यावसायिकाने पोलिसांत तक्रार दाखल केली. नोव्हेंबर 2018 ते ऑगस्ट 2021 तसेच एप्रिल 2019 ते जानेवारी 2022 या कालावधीत म्हाळुंगे, खालुंब्रे व भांबोली येथे हा प्रकार घडला.

स्क्रॅप व्यावसायिक संतोष शंकर गुप्ता (वय 37, रा. पूर्णानगर, शाहूनगर, चिंचवड) यांनी याबाबत चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार हर्षल खराबी, अनिकेत खालकर यांच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संतोष गुप्ता यांचा कंपनीतून स्क्रॅप खरेदी करण्याचा व्यावसाय आहे. रोजन बर्जर आणि बेलडन या कंपन्यामधून स्क्रॅप खरेदीच्या बदल्यात महिन्याला 15 हजार तसेच एक किलो स्क्रॅप मागे एक रुपया अशी खंडणीची मागणी आरोपी यांनी केली.

फिर्यादी यांनी खंडणी पोटी आरोपी हर्षल याला 34 महिन्यांत 5 लाख 10 हजार रुपये व आरोपी अनिकेत याला 34 महिन्यांत 4 लाख 95 हजार रुपये आणि किलो प्रमाणे दोन्ही आरोपींना 3 लाख 30 हजार रुपये खंडणी दिली. आरोपी यांनी वाढीव खंडणीची मागणी केल्याने फिर्यादी यांनी पोलिसांत धाव घेतली. चाकण पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button