breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

‘मी सांगतो तेवढंच ऐकायचं’, नाना पटोले यांच

मुंबई – विधानसभा अध्यक्ष पदावर नाना पटोले यांची आज (रविवारी) बिनविरोध निवड झाली. त्यांनी विधानसभा अध्यक्ष म्हणून पदभार स्विकारला. त्यानंतर ते म्हणाले की, ‘मी सांगतो तेवढंच ऐकायचं….’ असं म्हटलं. त्यांचे हे उदगार ऐकता सभागृहात उपस्थित सर्वांमध्ये एकच हशा पिकला. 

सत्ताधारी पक्षाच्या विनंतीनंतर विरोधी बाकावर बसलेल्या भाजपकडून विधानसभा अध्यक्ष पदासाठी किसन कथोरे यांच्या नावे भरण्यात आलेला अर्धिकृतपणे मागे घेण्यात आला. ज्यानंतर महाराष्ट्राच्या परंपरेनुसार या पदाची निर्विवादपणे विधानसभा अध्यक्षांची निवड झाल्यामुळे नाना पटोले यांनी आज (रविवारी) विधानसभा अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला.

विधानसभेचे हंगामी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी शनिवारच्या घडामोडींचा संदर्भ आणि अध्यक्ष पदासाठीच्या अर्जांची माहिती देत निवड प्रक्रियेविषयीचं चित्र स्पष्ट करत नाना पटोले यांना स्थानापन्न होण्याची विनंती केली. ज्यानंतर सत्ताधारी पक्षाचे नेते, मुख्यमंत्री उद्दव ठाकरे, भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि नवनियुक्त मंत्री जयंत पाटील हे नाना पटोले यांना शुभेच्छा देत त्यांना अध्यक्षांच्या आसनापर्यंत घेऊन आले.

औपचारिक घोषणेनंतर नाना पटोले अध्यक्षपदी विराजमान होताच, त्यांनी पदभार स्वीकारला आणि सभागृहाच्या कामकाजाला सुरुवात झाली. कामकाजाच्या सुरुवातीलाच पटोले यांनी वातावरणातील खेळीमेळीचं वातावरण आणि सभागृहातील सदस्यांचा एकंदर उत्साह होतो.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button