breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘वई लव्ह यु’ या आंतरराष्ट्रीय संस्थेकडून पालिकेला 10 हजार मास्क वाटप

पिंपरी / महाईन्यूज

आंतरराष्ट्रीय वुई लव्ह यु संस्था जगभरातील कोविड साथीच्या रोगावर मात करण्यासाठी अविरत परिश्रम घेत आहे. या संस्थेने पिंपरी-चिंचवड महापालिकेला तब्बल 10 हजार एन 95 मास्कचे मोफत वाटप केले.

आंतरराष्ट्रीय वुई लव्ह यु संस्था (अध्यक्ष जहांग गिल-जाह, यानंतर वुई लव यू संस्था) जगभर कल्याणकारी उपक्रम राबविणारी संस्था आहे. ही संस्था जगभरातील कोरोना विषाणूजन्य साथीच्या रोगावर मात करण्यासाठी मदत करते. 30 डिसेंबर रोजी त्यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका (PCMC) येथे भेट दिली. आणि कोविड -१९ चा प्रसार रोखण्यासाठी 10 हजार मास्कचे मोफत वाटप केले. पीसीएमसीच्या (PCMC) हद्दीतील आपत्तीग्रस्त आणि असुरक्षित गटातील लोक लाभार्थी ठरतील, या उद्देशाने त्यांनी मास्कचे वाटप केले.

वुई लव्ह यु या संस्थेच्या प्रशासकीय अधिकाऱ्याने मत व्यक्त केले की, “आम्हांला कोविड -१९ च्या साथीवर मात करण्यासाठी मदत करावयाची असून त्याच प्रयत्नांचा भाग म्हणून मास्कचे वाटप केले आहे. ज्याद्वारे संसर्ग पसरण्यास आळा बसतो. मला आशा आहे की आपण लवकरच या संकटावर मात करू आणि आपले दैनंदिन जीवन पूर्वपदावर स्थिर करू.

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांनी आंतरराष्ट्रीय वुई लव्ह यु संस्थेचे स्वागत केले. ते पुढे म्हणाले, “कोवीड-१९च्या साथरोगातील प्रसार रोखण्यासाठी त्यांनी मोठे योगदान दिले आहे. पीसीएमसीच्या वतीने त्यांनी मनापासून आभार आणि कृतज्ञता व्यक्त केली.

यंदा ही संस्था कोविड -१९ वर मात करण्यासाठी अनेक उपक्रम राबवित आहेत. त्यांनी अमेरिका, ऑस्ट्रेलिया, युगांडा, रवांडा, डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो, फिलिपाइन्स, मंगोलिया, मेक्सिको आणि ब्राझील यांसारख्या ३० हून अधिक देशांना अन्न आणि दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंसह एकूण ४ लाख ३० हजार चेहऱ्यांचे मुखपट्टी (mask) आणि पीपीई किट सारखी वैयक्तिक सुरक्षा उपकरणे दान केली.

तत्पूर्वी, त्यांनी इक्वेडोर आणि लाओस तसेच कोरियाला एकूण ५०,००० मुखपट्टींचे (mask) मोफत वाटप केले आणि प्रत्येक देशात कोविड -१९ चा प्रसार रोखण्यास मदत केली. याव्यतिरिक्त, त्यांनी लाओस आणि इक्वेडोरला एकूण २,००० कोरियन बनावटीच्या कोरोनाव्हायरस चाचणी किटची मोफत वाटप करून मदत केली.

या शिवाय, अमेरिकेतील न्यू जर्सी येथील प्राथमिक शाळेतील विद्यार्थी कोविड-१९ च्या महामारीच्या काळात वेगाने बदललेल्या शैक्षणिक वातावरणात आधुनिक उपकरणांच्या अभावी ऑनलाईन शिक्षणात सहभागी होऊ शकत नव्हते त्या गरजू विद्यार्थ्यांना लॅपटॉप आणि टॅब्लेटचे मोफत वाटप केले, जेणेकरून त्यांचे भविष्य उज्ज्वल होण्यास मदत झाली. या बिकट परिस्थितीत, संपूर्ण जगामध्ये मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा जाणवत होता अशा स्थितीमध्ये संस्थेने अमेरिका, ब्राझील, न्यूझीलंड आणि इतर अनेक देशांमध्ये जागतिक रक्तदान अभियानाच्या (Worldwide Blood Drive) माध्यमातून अनेक मौल्यवान जीव वाचविण्यास मदत केली.

वुई लूव्ह यू संस्थेचे प्रतिनिधी म्हणतात की, “आम्हांला आशा आहे की सर्व नागरिक कोविड -१९ सहित प्रत्येक आव्हानांवर मात करतील व येणारे नूतन वर्ष सर्वांसाठी भरभराटीचे असेल. आईच्या प्रेमळ मनाने व तिच्या मायेप्रमाणेच आम्हीसुद्धा जगाला उत्तम व आनंदी बनविण्यासाठी कठोर परिश्रम करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button