breaking-newsराष्ट्रिय

“वंचित आघाडीच्या चिन्हासमोरील बटण दाबले तरी भाजपालाच मत”

राज्यात दुसऱ्या टप्प्यात ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याच्या तक्रारी समोर येत असतानाच आता सोलापूरमध्ये वंचित आघाडीचे उमेदवार प्रकाश आंबेडकर आणि त्यांचा मुलगा सुजात आंबेडकर यांनी गंभीर आरोप केले आहे. सोलापूरमधील एका मतदान केंद्रावर ईव्हीएममध्ये वंचित आघाडीच्या चिन्हासमोरील बटण दाबले तरी कमळालाच (भाजपाला) मत जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या आरोपानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी ईव्हीएम सील करुन नवीन यंत्र दिल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.

सोलापूरमध्ये काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे व भाजपाचे डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य आणि वंचित बहुजन आघाडीचे अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर अशी तिहेरी लढत आहे. प्रकाश आंबेडकर यांचा मुलगा सुजात आंबेडकर यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया दिली. सोलापूरमधील एका मतदान केंद्रावर वंचित आघाडीच्या चिन्हासमोरील बटण दाबले तरी भाजपालाच मत जात असल्याचा आरोप त्यांनी केला. तर प्रकाश आंबेडकर यांनी देखील अशी घटना घडल्याचे सांगत प्रकार लक्षात आल्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी मशीन सील करुन नवीन यंत्र पाठवल्याचे स्पष्ट केले.  तर सोलापूरमधील जिल्हाधिकाऱ्यांनी अशी कोणतीही घटना घडली नसल्याचे सांगितले. प्रकाश आंबेडकर यांचे आरोप निराधार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, दुसऱ्या टप्प्यात राज्यातील १० जागांवर मतदान होत आहे. सकाळी मतदानाला सुरुवात झाल्यापासून ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याच्या घटना वाढल्याचे समोर येत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button